तीर्थक्षेत्र आळंदी येथे आज अजा एकादशीनिमित्त तोबा गर्दी होती. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात भाविक भक्तांनी दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या. एकादशी,रविवार, आणि श्रावणी सोमवारतील शेवटचा दिवस या त्रिवेणी संगमामुळे भाविक भक्तांची भक्तीची लाट आळंदी कडे वळली होती.
विठू माऊलीचा गजर करत. ज्ञानोबा तुकोबाचा जय घोष. भगवी पताका खांद्यावर घेत, प्रदक्षिणा मारताना जागोजागी भाविक, वारकरी दिसत होते. मंदिर परिसरात तर कार्तिकी वारीचे वेळी असणाऱ्या गर्दीचा अनुभव येत होता.इतक्या मोठ्या प्रमाणात असणारी गर्दी रात्रीचे अकरा वाजले तरी ओसरण्याचे नाव घेत नव्हती. आळंदीतील सर्व धर्मशाळांमध्ये भक्ती भजन रात्री उशिरापर्यंत चालू होती. मंदिर परिसरातील हॉटेलमध्ये फराळी चिवडा, शेंगदाणे, साबुदाणा खिचडी,साबुदाणा वडे,असे एकादशी निमित्त असलेल्या फराळांची मोठ्या प्रमाणात रेलचेल होती.
मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक भक्त एकादशी निमित्त असणाऱ्या फराळाच सेवन करत होते.श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिरामध्ये दर्शन बारीच्या रांगेतून दर्शन घेऊन बाहेर पडत असताना वारकरी भाविक भक्तांना. खिचडीचे मोफत वाटप दारातच करण्यात येत होते.”चला आळंदीला जाऊ… ज्ञानदेव डोळा पाहू”..या भक्तीची उत्कंठता गगनाला मावताना दिसली.श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटी यांच्याकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविक ,भक्त ,महिला, अबाल वृद्ध. यांना सुलभ दर्शन व्हावं याची अचूक व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली. इंद्रायणीचे दोन्ही तट भाविक भक्तांनी भरून गेले होते.आणि भक्तांची मांदियाळी .ज्ञानोबा तुकोबारायाचा गजर आणि गर्दीने फुलून गेलेला इंद्रायणी घाट पाहून डोळे दिपून जात होते.