आज रात्री नऊ वाजता पाणीपुरवठा सुरू होणार नगरपरिषद कर्मचारी अजूनही कुरुळी वॉटर पंपिंग स्टेशनवर मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची माहिती

Share This News

बातमी 24तास Web News Portal ( आळंदी प्रतिनिधी अरिफ शेख) आळंदीला आज रात्री होणारा आठ वाजता चा पाणीपुरवठा अजूनही झालेला नाही. त्याबाबत वेगवेगळ्या अडचणींना प्रशासनाला सामोरे जावे लागत आहे.गुरवारी नियमित खंडित पाणीपुरवठा नंतर भामा आसखेड येथील मुख्य पाणीपुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेलाही पाणी मिळू शकले नाही त्यामुळे पुणे महानगरपालिकेने त्यांच्याकडील पूर्ण भरणा करण्यासाठी उच्च दाबाने (प्रेशरने) पाणीपुरवठ्याची मागणी केली तर नंतर आळंदीत झालेल्या पाणीपुरवठ्याला कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या कारणास्तव वेळेत पाणीपुरवठा करता आलेला नाही त्यानंतर आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी जास्त दाबाने पाणीपुरवठा करण्याची विनंती पंपिंग स्टेशन भामा आसखेडला केली आणि येणाऱ्या अडचणींची माहिती दिली त्यानंतर पूर्ण दाबाने पाणीपुरवठा सुरू झालेला आहे. आळंदीत पाणी दाखल होऊन सुमारे पाच सहा तास होऊन गेले आहेत पाण्याच्या टाक्या भरण्याचे काम चालू आहे. तसेच सुमारे चार दिवसापासून पाणी नाही या कारणामुळे पाईपलाईन मोकळी असल्याने. पाईपलाईनने एअर पकडला आणि सदर एअर काढण्याच्या कामाला सुमारे चार ते पाच तास वेळ गेला.त्यासाठी आळंदी नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी अध्यापही मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचे आदेशाने त्या ठिकाणी थांबून आहेत सुरळीत पाणीपुरवठा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असून आळंदीमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या सार्वजनिक टाक्यांमध्ये पाणी भरलं जात आहे परंतु कमी दाबाचा पाणीपुरवठा असल्याने सुमारे पाच ते सहा तासाचा वेळ गेला व वॉश आउट साठीचा अधिकचा तीन तासाचा वेळ गेला अशी माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे आळंदी नगर परिषद यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठ्याच्या बाबत अखंडितपणा ठेवण्यासाठी कार्यतत्पर असल्याचेही मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले. परंतु मुळातच भामाआसखेड येथून निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे आणि लिकेज काढायचे काम वेळेत न झाल्याने पर्यायाने आळंदीला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे. परंतु आज रात्री नऊ वाजता पाणीपुरवठा सुरळीत सुरू होणार आहे तद नंतर सुमारे 13 टप्पे हे तासात तासाच्या गॅपने पूर्ण केले जाणार आहेत.आणि नागरिकांना प्रथम पाणी देण्यासाठी रात्रभर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभाग कडून कार्यतत्परता दाखवली जाणार असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले आहे. तसेच सर्व आळंदीकर नागरिक यांनी याबाबत सहकार्य करण्याची भूमिका नगरपरिषद प्रशासनाने ठेवावी अशी विनंती केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy