एस टी महामंडळाच्या नादुरुस्त एस टी मुळे प्रवाशांना मनस्ताप.

Share This News

बातमी 24तास Web News Portal

(राजगुरूनगर, विजयकुमार जेठे )
पुणे नाशिक महामार्गावर धावणाऱ्या एस टी महामंडळाच्या नादुरुस्त बसेस मुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे, पुण्यावरून  नियमित नाशिकला धावणाऱ्या बऱ्याच बसेस नादुरुस्त अवस्थेत धावत असल्याने रस्त्यात कोठेही बंद पडण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे.या बाबत एस टी महामंडळाने वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.

शिवाय अशा नादुरुस्त बसेस मुळे प्रवाशांच्याही जीवाला धोका पोहोचू शकतो, प्रवाशांच्या जीवाशी खेळणे महामंडळाला परवडणारे नाही.सामानय जनतेसाठी एक विश्स्वासाची वाहतूक व्यवस्था म्हणून महामंडळाकडे पाहिले जात आहे, शिवाय प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य एस टी महामंडळाचेच आहे.वरील घटनेत पुण्यावरून नाशिक महामार्गावर धावणाऱ्या बस मध्ये नारायणगाव येथे उतरवायचे आहे म्हणून बसले या प्रवाशांना वेळेत नारायणगाव येथे पोहचणे आवश्यक असल्याने विश्स्वासाने बसमध्ये बसले, परंतू बस राजगुरुनगर पर्यंत आल्यानंतर बिघडली, आणि पर्यायाने प्रवाशांना दुस-या बसमध्ये पाठवून देण्याची वेळ आली. त्यात सर्वच गाडी खाली झाल्यावर एवढे प्रवाशी कोणत्या बसमध्ये बसवायचे या मुळे पुण्यावरून येईल त्या बसमध्ये प्रवाशी अक्षरशः बळेच कोंबले जातात कारण जाण्यासाठी सर्वच प्रवाशांची घाई असते,काहींची उभे राहून प्रवास करण्याची मनस्थिती नसते, वेळ वाया जातो, आणि मग अशा वेळी असे वादविवाद पहायला मिळत आहेत, यामुळे महामंडळाने याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy