मुलाच्या स्मृती दिनानिमित्त पालकांनी प्रशालेलं दिली 51000 रु. ची देणगी

Share This News

बातमी 24तास Web News Portal

(प्रतिनिधी) श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी कै.अक्षय कृष्णा कड या प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांच्या पालकांनी श्री कृष्णा कड (वडील)सौ. मंदा कृष्णा कड (आई)यांनी प्रशालेला रु 51000 देणगी स्वरूपात दिले.एका असाध्य आजाराने काही दिवसांपूर्वी अक्षय याचे निधन झाले.त्याच्या पालकांना त्याच्या नावाने विविध ठिकाणी देणगी देण्याची इच्छा होती.ती या रूपाने त्यांनी पूर्ण केली.त्यानिमित्ताने प्रशालेचे प्राचार्य श्री सुभाष गारगोटे यांनी चेक स्वरूपात तो स्वीकारले.यानिमित्ताने सर्व कड कुटुंबातील सदस्य व प्रशालेचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी संस्था पदाधिकारी श्री अनिल ठुबे,श्री रामदास खाटमोडे,उपप्राचार्य श्री तुकाराम थोरात,टेक्निकल विभाग प्रमुख श्री संदीप म्हेत्रे,पर्यवेक्षक श्री आण्णासाहेब कोडग,सामाजिक कार्यकर्ते श्री माऊली कड,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.याकामी श्री प्रणव पन्हाळे,श्री राजेंद्र खरमाटे व श्री अनिल ठुबे यांनी प्रयत्न केले.श्री मुरलीधर मांजरे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy