
बातमी 24तास,चाकण (वृत्त सेवा) चाकण नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत जनतेने दाखविलेल्या विश्वासास पात्र ठरत नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती मनिषाताई सुरेशभाऊ गोरे या आपल्या पदाची अधिकृत जबाबदारी गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता स्वीकारणार आहेत.हा पदग्रहण समारंभ नगरपरिषद कार्यालय, चाकण येथे पार पडणार असून, यावेळी शहरातील मान्यवर नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, सेवकवर्ग तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत चाकण शहरातील जनतेने दिलेल्या विश्वासास न्याय देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक व पारदर्शक कारभार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला जाणार आहे. शहराच्या पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण व नागरी सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.या पदग्रहण सोहळ्यास स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठाण, खेड तालुका, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व सेवकवर्ग यांचे सहकार्य लाभणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.