
बातमी 24तास (वृत्त सेवा)चाकण नगरपरिषद यांची नुकतीच निवडूक पार पडली आहे. त्यात प्रथम लोक नियुक्त महिला नगराध्यक्षा श्रीमती मनिषा सुरेशभाऊ गोरे यांचा व निवडून आलेले नगरसेवक व पतसंस्थेचे संचालक नितीन गुलाबराव गोरे व संचालिका सौ. साधना दिपक गोरे व नगरसेवक प्रकाश लक्ष्मण गोरे, रणजित सखाराम जरे, प्रकाश राजाराम भुजबळ, हर्षल गेणभाऊ लेंडघर, प्रेम शिवाजी जगताप, आकाश ज्ञानेश्वर जाधव, साहेबराव शंकरराव कड, मंगेश शिवाजी कांडगे, नगरसेविका सौ. रूपाली राहुल कांडगे, सौ. सुवर्णा शाम राक्षे, सौ. आरती प्रितम परदेशी, सौ. पुनम सुनिल शेवकरी, सौ. स्वाती संतोष लेंडघर, सौ. वर्षा सुयोग शेवकरी, सौ तृप्ती किशोर जगनाडे, सौ. अनिता श्रीराम घोगरे, श्रीमती विजया शिवाजी तोडकर, सौ विजया दत्तात्रय जाधव, सौ. रेश्मा तुषार मुटके यांचा चाकण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने जाहिर सत्कार करण्यात आला.

सत्कार प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नवनाथ महादेव शेवकरी, व उपाध्यक्ष गिरीष अशोक गोरे संचालक निलेश बबन टिळेकर, सुनिल मारूती नायकवाडी, गोरक्षनाथ शंकर कांडगे, अशोक ज्ञानेश्वर बिरदवडे, लक्ष्मण शंकर वाघ, सुरेश जगन्नाथ कांडगे, बाळासाहेब वसंतराव साळुंके शाखा-खालुंब्रेचे सल्लागार अंकुश विष्णु पवार व शाखा कुरूळीचे सल्लागार पांडुरंग विष्णु बनकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
यावेळी नगरसेवक प्रकाश राजाराम भुजबळ यांनी पतसंस्था ही आपल्या चाकण मध्ये मोठ्या स्वरूपात सभासदांना कर्ज वाटप व ठेवी मध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यात माझी सुध्दा ठेव ठेवण्यात येणार आहे तसेच निवडून आलेले सर्व नगरसेवक व नगरसेविका यांनी ठेवी ठेवण्यासंबधी आवाहन केलेले आहे, रणजित सखाराम जरे यांनी माझ्या सारख्या सभासदांला सुध्दा संस्थेने आर्थिक मदत केलेली आहे, सौ. रेश्मा तुषार मुटके यांनी पतसंस्थे बद्दल गुणगौरव करतांना “सहकार समृद्धीचे यशोमंदीर” या प्रमाणे संस्थेचे काम करत आहे उद्गार केले आहे. तसेच लोक नियुक्त नगराअध्यक्षा यांनी चाकण नगरपरिषद मधील सर्व नगरसेवकांना एकत्रित घेऊन चाकण गावाचा विकास व समस्याचे काम केले जाईल. तसेच पतसंस्थेस येणा-या अडचणीसाठी मदत सुध्दा केली जाईल असे सत्काराच्या वेळी सांगितले. तसेच संस्थेचे संस्थेचे विदयामन संचालक तसेच चाकण नगरपरिषद मध्ये बिनविरोध निवडुन आलेले नगरसेवक नितीन गुलाबराव गोरे यांनी सत्कार सभारंभवेळी चाकण नगरपरिषद असलेल्या समस्या व सर्व नगरसेवक यांनी आप आपल्या पक्षाकडून व पालकमंत्री यांच्याकडून निधीतून चाकणचा विकास करू असे मत सत्कार वेळी यांनी व्यक्त करण्यात आले. तसेच संस्थेचे संचालक सुनिल मारूती नायकवाडी, अशोक ज्ञानेश्वर विरदवडे व गोरक्षनाथ शंकर कांडगे यांनी लोक नियुक्त महिला नगराध्यक्षा व नगरसेवक यांचा सत्कार संभारभा वेळी संस्थेची प्रगती बाबत मनोगत व्यक्त केले. संस्थेचे विदयामन उपाध्यक्ष गिरीष अशोक गोरे यांनी लोक नियुक्त महिला नगराध्यक्ष व निवडून आलेले सर्व नगरसेवक व उपस्थित सभासद वर्गाचे संस्थेच्या वतीने आभार मानले.