
बातमी 24तास, (चाकण प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी खेड तालुक्याच्या वतीने नागरिकांच्या विविध शासकीय अडचणी सोडवण्यासाठी चाकण येथील ग्रामवैभव इमारत, नगरपरिषद कार्यालयात विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या मदत कक्षाच्या माध्यमातून महसूल विभाग, विद्युत विभाग, पोलिस स्टेशन, नगरपरिषद तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणी संदर्भातील समस्या मार्गी लावण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन व सहाय्य केले जाणार आहे.अशी माहिती खेड तालुका अध्यक्ष भगवान मेदनकर यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयीन प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.या प्रसंगी खेड तालुका अध्यक्ष भगवान मेदनकर यांच्यासह जिल्हा सरचिटणीस प्रिया पवार, चाकण मंडल सरचिटणीस संदेश जाधव, मंडल उपाध्यक्ष बाळासाहेब भोपे, सहकार आघाडी खेड तालुकाध्यक्ष अनिल सोनवणे, सेवा आघाडी जिल्हा संयोजक प्रितम शिंदे, युवा मोर्चा चाकण मंडल अध्यक्ष धिरज वाळुंज, युवा मोर्चा सरचिटणीस नसीम पठाण, अल्पसंख्यांक मोर्चा चाकण मंडल अध्यक्ष शार्दुल पठाण, माजी शहराध्यक्ष दत्ता परदेशी, दक्षिण भारतीय आघाडी चाकण मंडल अध्यक्ष गणपती गौडा पाटील, वाहतूक आघाडी उपाध्यक्ष संतोष ओतारी, समीर शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या मदत कक्षामुळे नागरिकांच्या शासकीय कामांना गती मिळणार असून विविध विभागांशी संबंधित तक्रारी व अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.