
बातमी 24तास,
राजगुरुनगर प्रतिनिधी,( गणेश आहेरकर) खेड तालुक्यातील कोहिंडे बुद्रुक येथील श्री क्षेत्र कुंडेश्वर मंदिर परिसराला पुरातन कालीन स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेण्यात आली असून, या अंतर्गत सुमारे ६ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी आमदार मोहिते पाटील म्हणाले की, कुंडेश्वर, चक्रेश्वर, शंभू महादेव मंदिर, भामेश्वर ही गिरीस्थाने असून या सर्व मंदिरांना पुरातन काळापासून धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. तसेच सिद्धेश्वर, काळेश्वर, शैनेश्वर, सोमेश्वर ही जमिनीवर असलेली भगवान शंकराची हेमाडपंथीय मंदिरे असून त्यांची रचना व स्थापत्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. या सर्व बाबींचा विचार करून श्री क्षेत्र कुंडेश्वर परिसराचा विकास पुरातन कालीन स्वरूप जपणाऱ्या पद्धतीने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.या विकासकामांत दोन दीपमाळांची उभारणी, नेवासा दगडातील पायऱ्या, दगडी रस्ता, दगडी फरशीचे ब्लॉक, संरक्षक भिंत (कंपाऊंड) आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय श्री क्षेत्र कुंडेश्वर येथे सुमारे ३ कोटी रुपये खर्चून रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री क्षेत्र कुंडेश्वर येथे घडलेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पाईट पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जयसिंग दरेकर यांच्या पत्नीला अधिकृत उमेदवारी जाहीर केली. जयसिंग दरेकर हे प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करून काम करणारे प्रामाणिक कार्यकर्ते असून, त्यांच्या माध्यमातून या परिसरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागल्याचे मोहिते पाटील यांनी नमूद केले.या कार्यक्रमास पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, कुंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सखाराम खेंगले, खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंग दरेकर, पश्चिम विभाग अध्यक्ष अमोल पाणमंद, देवस्थानचे खजिनदार संजय रौंधळ, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष हिरामण रौंधळ,संचालक लक्ष्मण घोलप, भीमाजी कचाटे, आनंदराव कचाटे, संभाजी कुडेकर, सत्यवान पाणमंद, रामदास खेंगले, चिंतामण शिंदे, बबन शिंदे,पांडुरंग बच्चे, पाईट पंचायत समिती गणाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार पल्लवी जयसिंग दरेकर,देवतोरणे ग्रामपंचायतीच्या सरपंच आरती शिंदे, चेअरमन अनिल डांगले, पंडित रौंधळ, विजय करंडे, रामदास सावंत, हिरामण कंद, सत्यवान वाळुंज, अतुल आहेरकर, सौरभ कोळेकर, माजी सरपंच मंगल भांगे, राजश्री ढोरे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास खेंगले यांनी केले तर आभार गणेश आहेरकर यांनी मानले.