
बातमी 24तास
प्रतिनिधी आरिफ शेख
.!!आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव.!!!!दैवताचे नाव सिद्धेश्वर.. !!!!चौऱ्याएंशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा. !!!!हा सुख सोहळा स्वर्गी नव्हे!!
माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्या प्रारंभ झाला आहे श्री गुरु हैबत बाबा यांच्या पायरी पूजन करत समाधी सोहळ्यास प्रारंभ झाला आहे.यावर्षी माऊलींचा जन्मशताब्दी सोहळा म्हणून विविध कार्यक्रम आळंदीतील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी मार्फत राबवले जात आहेत.त्यामधील हा समाधी सोहळा असल्याने सुमारे दहा ते पंधरा लाख भाविक दर्शनासाठी आळंदीत दाखल होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त भाविक आळंदी साठी रवाना झालेले आहेत.आळंदी भाविकांनी फुलून गेलेली आहे. विविध परिसरामध्ये भाविकांच्या राहू द्या आणि इंद्रायणी तीरी भाविकांची मोठी गर्दी आहे.विविध प्रकारच्या दुकानांची रेलचेल येथे पाहायला मिळते आहे.आळंदीच्या विविध भागांमध्ये भाविकांच्या सोयी सुविधांसाठी विविध प्रकारची दुकाने लागलेली आहेत. माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी विविध भागातून पायी चालत वारकरी आळंदी साठी रवाना झालेले दिसतात. मजल दरमजल करत मोठ्या प्रमाणात पायी चालणारे वारकरी आळंदीला येणाऱ्या प्रमुख रस्त्यावर दिसून आहेत.
!! चला आळंदीला जाऊ !!!!ज्ञानराज डोळा पाहू!!. या भावना उराशी बाळगत. भक्ती रसात लीन झालेले भाविक आळंदीत दिसून येत आहे. प्रशासनाने जय्यत तयारी केली असून विविध भागांमध्ये पाण्याची टॅंकर व्यवस्था. तसेच सुमारे 550 सूचना दर्शक फलक. आळंदीचे प्रमुख महत्त्व रस्त्यावर लावण्यात आलेले आहेत. यावेळी मोठी यात्रा भरणार यासाठी पोलिस प्रशासन. आळंदी नगरपरिषद. विद्युत पुरवठा विभाग. अत्यावश्यक सेवा विभाग. आरोग्य विभाग वारकर भाविकांना सुविधा पुरवता यावेत यासाठी सर्व प्रकारच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतेय.