
बातमी24तास
(प्रतिनिधी अरिफ शेख. ) माऊलींच्या जन्मशत्कोत्तर शताब्दी सोहळ्याच्या वर्षांमुळे आळंदी कार्तिक यात्रा 2025 विशेष भरण्याची शक्यता आहे.सुमारे दहा ते पंधरा लाख भाविक आळंदीत येऊन दर्शन घेतील असा प्रशासकीय रिपोर्ट आहे.
या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना माहिती विचारली असता.त्यांनी सांगितले की,पोलीस प्रशासन,वीज महामंडळ, पाणीपुरवठा विभाग,तसेच आरोग्य विभाग या सर्वांच्या संयुक्त सहभागाने विशेषनियंत्रण कक्ष मदत कार्य मिळण्यासाठी तसेच अत्यावश्यक सुविधा वेळेत व्हाव्यात यासाठी नबनवण्यात आलेला आहे.आळंदी नगर परिषदेमध्ये सदर नियंत्रण कक्षा मार्फत नित्य नियमित च्या असणाऱ्या सर्व सोयी सुविधांबाबत तात्काळ मदत प्राप्त होणार असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले. तसेच आळंदी मध्ये भाविकांचे सोयीसाठी दररोज पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली असून विविध ठिकाणावर सुलभ शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
वारकरी भाविक धर्मशाळेमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवला तर आळंदी नगरपरिषद विशेष टँकरद्वारे त्यांना पाणीपुरवणार असल्याची माहिती मुख्याधिकारी खांडेकर सांगतात.दरम्यान आळंदीची वारी कधी नव्हे ती काही दिवस आधीच भरू लागलेली आहे.
इंद्रायणी नदी तीरावर भाविक मोठ्या संख्येने जमा होतात त्यासाठी नगर परिषदेमार्फत त्यांचे सुरक्षेचे कारण लक्षात घेत एनडीआरएफ टीम, पोलीस प्रशासन,आणि आळंदी नगर परिषद कर्मचारी यांचे मार्फत देखरेख केली जाऊन विशेष मदत पुरवली जाणार आहे.आळंदी मध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांच्या गाड्या येऊ लागल्या आहेत.दुकाने सजू लागली आहेत.दिवस रात्र भरणारी ही वारी ..यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक आळंदीसाठी येत असतात.
!!”चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू”;!! ही भावना मनात ठेवत विठू माऊलीचा गजर या आळंदी मुक्कामी वारीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यापर्यंत राहणार आहे.पोलीस प्रशासनाने वाहतूक या आधीच वळवली असून दिनांक 12 नोव्हेंबर तारखेपासून वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेले आहेत.विविध ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली असून.विविध सूचनांचे फलक प्रदक्षिणा रस्त्यावर लावण्यात आलेले आहेत.भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच इतर काही अडचण लागल्यास पोलीस प्रशासनाची तत्काळ संपर्क साधावा असे सूचना दिल्या गेलेल्या आहेत प्रदक्षिणा रस्त्यावर हातगाडीवाले इतर दुकानदार व्यापारी यांना फुटपाथ वर बसण्यास बंदी करण्यात आलेली आहे.750 वा समाधी उत्सव सोहळा होत असल्याने, रेकॉर्ड ब्रेक गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे प्रशासन मोठ्या गांभीर्याने या वारीकडे पाहत आहे.विविध पोलीस स्टेशन यांचे पोलीस अधिकारी,कर्मचारी, शिपाई यांना बंदोबस्ताकामी आळंदीमध्ये पाचरण करण्यात आलेले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलीस विभाग, तसेच मुंबई व इतर प्रमुख शहरातील बराचसा पोलीस स्टाफ आळंदी मध्ये दाखल झालेला आहे.नागरी सुविधा बाबत काही अडचणी आल्यास तात्काळ मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्याशी संपर्क करावा अशी आवाहन आळंदी नगरपरिषद यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे.