
आळंदीत जमणार दहा ते पंधरा लाख भाविक
बातमी 24तास (प्रतिनिधी आरिफ शेख) श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जन्म शतकोत्तर सोहळ्याचा औचित्य साधून यावर्षी आळंदीत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
इतर वेळेस असणारी संख्या आणि आता लाखोंच्या संख्येने येणारा भाविकांचा लोंढा यामुळे आळंदीत मोठ्या प्रमाणात वाहतुकीत बदल करणे गरजेचे असल्याने विवेक पाटील,उपायुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखा विभाग यांनी आदेश निर्गमित केलेले आहे.मुळात तीर्थक्षेत्र आळंदीच्या जवळ संत तुकाराम महाराज गाथा मंदिर आहे. त्याचप्रमाणे भंडारा डोंगरे आहे.माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी आलेले भाविक पर्यायाने देहूगाव आणि भंडारा डोंगर येथे दर्शनासाठी जात असतात.
सदर बाब निदर्शनास घेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व आळंदी पोलीस स्टेशन यांनी विशेष नियोजन करणे कामी विशेष बदल केलेले आहेत.कार्तिकी वारी 2025 आळंदीच्या निमित्ताने.पोलीस प्रशासनाकडून मरकळ लोहगाव मार्गे आळंदीत येणारे,चाकण शेल पिंपळगाव मार्गे आळंदीत येणारे,आळंदी फाटा,भोसे फाटा,माजगाव फाटा या मार्गे आळंदीत येणारे, त्याचप्रमाणे भोसरी मॅक्झिन चौक,पुणे रोड मार्गे आळंदी येणारे तसेच चिंबळी फाटा मोशी मार्गे आणि मोशी वरून आळंदी कडे येणारे अशा सर्व प्रकारच्या रस्त्यांवर,आळंदी प्रवेश बंदी करण्यात आलेले आहे. पर्यायी रस्त्यांच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या आहेत कार्तिकी वारी 2025 ही दिनांक 12 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 20 नोव्हेंबर 2025 या काळात भरणारी आह.त्यामुळे पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग श्री विवेक पाटील यांनी,वरील सर्व पूर्वीचे निर्बंध आदेश रद्द करत नवीन सूचना आदेश काढले आहेत.त्याप्रमाणे आळंदी कडे जाणारे सर्व रस्त्यांवर बंदी असून, पर्यायी असणाऱ्या बाह्यवळण मार्गाचा वापर करत वाहतूक करण्याच्या सूचना देण्यात आलेले आहेत.मुळात संत ज्ञानेश्वर महाराज जन्म शताब्दी शत्कोत्तर सोहळा यावर्षी भरणारअसून 750 वा उत्सव होत असल्याने आळंदीत अलोट गर्दी होणार आहे.सुमारे दहा ते पंधरा लाख भाविक आळंदीत येऊन माऊलींचे दर्शन घेतील अशी शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तवण्यात आलेल्या आहेत.एस टी महामंडळ तसेच पीएमपीएल बस वाहतुकीसाठी पुण्याकडे जाणाऱ्या करिता,योगीराज चौक येथे. तसेच शिक्रापूर नगर आणि चाकण कडे जाण्यासाठी हनुमान वाडी इंद्रायणी हॉस्पिटल चौक.तसेच वाघोली नगर हायवे लोणीकंद कडे जाण्यासाठी धानोरे फाटा चौक येथे.तसेच पिंपरी चिंचवड भोसरी याकडे जाण्याकरिता डूडूळ गाव जकात नाका चौक.या ठिकाणी एस टी आणि पी एम पी एल यांचे थांबे करण्यात आले असून. गावातून या बस वाहतूक कार्तिकी वारी 2025 करिता ठराविक काळासाठी नियोजित करण्यात आलेले आहे.