
बातमी 24तास (प्रतिनिधी आरीफ शेख) : राजगुरुनगर वकील बार असोसिएशन यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचे वतीने पुकारलेल्या आंदोलनात सहभाग नोंदवत.आज लाल फित लावून कामकाज चालवले.खेड येथील सत्र व जिल्हा न्यायालयात न्यायालयीन कामा साठी येणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय रद्द करत. कामकाज लाल फित लावून करण्याचा निर्णय घेतला.
राजगुरुनगर वकील बार असोसिएशन अध्यक्ष ॲड वैभव कर्वे यांनी याबाबत आमचे प्रतिनिधी यांना माहीती दिली की मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.रेवती मोहिते डेरे.मा.एम.एस.सोनक, मा.रवींद्र घुगे, मा.ए.एस.गडकरी.यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आहे.राजगुरूनगर वकील बार असोसिएशन अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य तसेच ज्येष्ठ वकील यांनी खेड न्यायालयाच्या प्रवेश व्दारासमोर एकवटुन सर्व वकील महिला व पुरुष सदस्य यांनी याबाबत माहिती दिली तसेच यावेळी वकील एकजुटी चा विजय असो अशा घोषणा ही देण्यात आल्यात.
दरम्यानच्या काळात सरन्यायाधीश भूषण गवई यापूर्वी मुख्यमंत्री यांचे कडून सकारात्मक आश्वासन मिळाल्याचे सांगितले आहे त्याचप्रमाणे.ॲड अहमदखान पठाण सर यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारकडून वकील संरक्षक कायदा करण्या बाबत पुढाकार घेतला जात आहे.त्यामुळे कोर्ट कामकाज नेहमी प्रमाणे चालले होते. वकील संरक्षक कायदा बाबत महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल गांभीर्याने पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे पुढील आठवठ्याच्या काळात विधेयक मंजुरी साठी आणले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशी अधिकृत माहिती ही समोर येत आहे.