
बातमी 24तास
(प्रतिनिधी आरीफ शेख ) आळंदी नगरपरिषद मतदार यादी मध्ये प्रचंड घोळ आणि गोंधळ असल्याचे समोर आले आहेत. अतिशय गांभीर्याची बाब म्हणजे नगर परिषदेच्या एका ठेकेदाराने त्याच्या घराजवळ सुमारे साडेतीनशे नव्याने नावे लावलेली आहेत.
आळंदीत होणारी ही चर्चा भविष्यामध्ये सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या प्रकारात मोडली जाणार अशी शंका व्यक्त होत आहे. मुळातच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून ऑनलाईन आळंदी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली बऱ्याच इच्छुक उमेदवारांनी या मतदार यादी डाऊनलोड करत सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर मात्र धक्कादायक बाब अशी की, मतदार यादी मध्ये दुरुस्ती करायची मागणी केलेली नसतानाही एकाच कुटुंबातली नावे वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत. असे निदर्शनात आले. त्याचबरोबर आळंदी नगर परिषदेमध्ये मार्फत एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्या पत्रकामध्ये आळंदी नगरपरिषद कार्यालयातून मिळालेल्या सही शिक्याच्या प्रती ग्राह्य धराव्यात असे आवाहन करण्यात आलेले आहे. मूळ मुद्दा मात्र काहीही असले तरी मतदार यादी मध्ये नावामध्ये आणि इतरही रकाने मध्ये मोठ्या चुका दिसून येत आहेत. अचूक मतदार यादी नसताना होणा-या निवडणुका यामुळे नागरिकांची जबाबदारी वाढणारी आहे मुळात मत देत असताना आळंदीकर नागरिक मतदार यांचा कस लागणार आहेत. चुकीच्या लोकाना निवडून देऊन स्वतःचाच विकास करणाऱ्यांपासून आळंदीला आपण वाचू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको याची सर्व जागरूक नागरिकांनी दखल घ्यायला लागेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आळंदीचा एक ठेकेदार मात्र कमालीचे प्लॅनिंग करत आहे.स्वतःच्या घराजवळ सुमारे साडेतीनशे आळंदीत नसलेली नावे लावून त्याची सुरुवात साडेतीनशे मतापासून होणार आणि सुमारे 200 मताने तो निवडून येणार अशा आवाक्यामध्ये तो नगरसेवक म्हणून मिरवणार आहे त्यामुळे आळंदी नगरपरिषद स्वायत्त संस्था बरबटली जाईल आणि भ्रष्टाचाराचा मूळ असणाऱ्या टक्केवारी मध्ये विकास घुसमटून मरेल अशी परिस्थिती निर्माण होत आहे. नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता भले गरिबाला मत देऊ पण चोराला नाही अशी परिस्थिती मध्ये मतदान करून, जागरूकता दाखवायला हवी,मतदार राजाला ताठ मानेने जगता यावे यासाठी ही खूप गरजेची गोष्ट राहणार आहे.