
बातमी 24तास( प्रतिनिधी आरिफ शेख )
आळंदी मध्ये इंद्रायणी घाटावर मोठ्या जल्लोषात छटपूजा नुकतीच साजरी करण्यात आली. काही महिन्यापूर्वी गणेशोत्सव काळामध्ये सदर इंद्रायणी घाट प्रदूषणानिमित्त बंद ठेवण्यात आला होता. इंद्रायणी नदी दूषित होते. नदीचे प्रदूषण होते तसेच इंद्रायणी नदीचे पावित्र्य याचा विचार करून सदर निर्णय प्रशासनाने घेतला होता.मात्र छटपूजेच्या काळी मुक्तद्वार करण्यात आले आणि मोठी संख्या छट पूजेच्या निमित्ताने इंद्रायणी काठावर पाहण्यात आली. विधीवत पूजा पाठ तसेच निर्माल्य इंद्रायणी नदी घाटावर दिसले. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये याबाबत ब्र शब्द काढला नाही याचे आश्चर्य आहे. विविध प्रसिद्ध माध्यम आणि याबाबत आवाज उठवणे गरजेचे होते. मुळात गणेशोत्सव काळ यामध्ये जे नियम आहेत तेच नियम नदी प्रदूषणाबाबत पाळले जायला हवीत प्रशासन अशी दुटप्पी भूमिका कसे काय घेऊ शकते याबाबत एकाही सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याकडून अथवा संघटने कडून प्रश्न विचारण्यात आला नाही. आळंदीतील तीर्थक्षेत्र असणाऱ्या इंद्रायणी नदीला मोठे महत्त्व आहे या नदीचे पाणी तीर्थ म्हणून वारकरी भाविक भक्त प्राशन करत असतात मध्यंतरीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असताना हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता. विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न म्हणून यावर प्रश्न विचारण्यात आले होते. इंद्रायणीचे पावित्र्य राखले जावो यासाठी तसेच सर्वच नद्या या पवित्र राहावेत यासाठी केंद्र शासन नमामि गंगे अशी योजना राबवत आहे.
दरम्यान आळंदी मध्ये छटपूजे निमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून आली.मताचे राजकारण ,की अन्य काही आणि त्याच बाबतीत पत्रकार असणाऱ्यांनाही पडलेली भुरळ ही मात्र आश्चर्याचा मुद्दा म्हणून पुढे येत आहे.
आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या गाईडलाईन प्रमाणे छटपूजेच्या काळामध्ये कुठले उल्लगन झालेले नाही किंवा होत नाही या कारणास्तव अडचणी येण्यात कारण नाही तसेच इंद्रायणी नदीमध्ये छटपूजेच्या काळी कुठलेही निर्माल्य टाकले जात नाही तसेच दिवा व इतर प्रदूषण होईल असे नदीपात्रामध्ये सोडले जात नाही. त्यामुळे छटपूजेला घाट मोकळा केला आणि गणेश उत्सव काळात बंद ठेवला या गोष्टीला कुठलाही कायदेशीर आधार नाही.