
बातमी 24तास चाकण प्रतिनिधी : चाकण नगरपरिषदेकडून शहरातील विकासकामांच्या निविदा प्रक्रिया चाकण शहरातील पाच ते सहा ठेकेदारांनी भरल्या होत्या,यातील एका ठेकेदारास जास्तीचे काम दिले आहे का ? याची माहितीचा अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून दोन ठेकेदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे.सदर घटना नगरपरिषदेच्या समोर घडल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.
चाकण नगरपरिषदेत सध्या प्रशासक आहे.पालिकेच्या माध्यमातून शहरात लाखो रुपयांचे विकासकामे करण्यात येत आहे.या विकास कामांच्या ऑनलाइन बंद निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असतात.अश्या निविदा परवाना धारक ठेकेदार भरू शकतात.आजवर ही कामे करण्यासाठी चाकण शहरात काही ठराविक ठेकेदारांचा राबता असल्याचे दिसून येत आहे.या ठेकेदारांना पालिकेतील काही अधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांचा छुपा पाठींबा असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.नगरपरिषदेची विकास कामे घेण्यावरून ठेकेदारांमध्ये दोन गट पडले आहे.यातील एका गटातील ठेकेदारास जास्त कामे दिल्याने दुसऱ्या गटातील ठेकेदारांनी त्याच्या कामांची माहिती मिळावी असा अर्ज दिल्याने ( दि.१६ ) नगरपरिषदेच्या समोर पाच ते सहा ठेकेदार समोरासमोर आले,त्यावेळी अर्ज का दिला यावरून दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.दोघांनी चाकण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
* कामांवरून ठेकेदारांमध्ये स्पर्धा -चाकण नगरपरिषदेत कामासाठी येणाऱ्या लोकांपेक्षा ठराविक ठेकेदारांचीच उठबस असल्याचे दिसत आहे.यातील काही ठराविक ठेकेदारांनाच लाखों रुपयांची विकास कामे दिली जातात.या कामांवरून ठेकेदारांमध्ये दोन गट पडले आहेत.यातून स्पर्धा निर्माण झाली आहे.यातूनच आजची मारहाणीची घटना घडली असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
