भामा आसखेड धरण १०० टक्के क्षमतेने भरले; पाणलोट क्षेत्रात ५७ मि.मी. पावसाची नोंद

Share This News

बातमी 24तास

चाकण ( प्रतिनिधी, अतिश मेटे ): खेड तालुक्यातील महत्त्वाचे भामा आसखेड धरण आज (दि. २८ सप्टेंबर, सकाळी ६ वाजता) शंभर टक्के क्षमतेने भरले असून पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. आजच्या सकाळपर्यंत धरण परिसरात ५७ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, धरणाची साठवण क्षमता २३०.६४७ दशलक्ष घनमीटर (८.१४ टीएमसी) असून त्यातील जिवंत साठा २१७.१२५ दशलक्ष घनमीटर (७.६७ टीएमसी) इतका आहे. गेल्या वर्षी याच दिवशीही धरण शंभर टक्के भरले होते.

यावर्षी आजवर एकूण ११०२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.सध्या धरणातून स्पिलवे द्वारे ९५७४ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू असून इतर कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. आजच्या दिवसात धरणात ८.८० दशलक्ष घनमीटर इतका नवीन पाण्याचा आलेख (इनफ्लो) आला आहे, तर १ जूनपासून आतापर्यंतचा एकूण आलेख २६६.५३४ दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे.धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रशासन सतर्क असून, पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत. नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy