
शेतीचे अर्थशास्त्र सांगणारा व जगणारा पहिला अर्थतज्ज्ञ शरद जोशी

बातमी 24तास चाकण (अतिश मेटे) : “शेतीचे अर्थशास्त्र सांगणारा व जगणारा पहिला अर्थतज्ज्ञ शरद जोशीसाहेब होते,” असे उद्गार शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण वडले यांनी व्यक्त केले. ते “योद्धा शेतकरी युगात्मा शरद जोशी तीन दिवसीय वैचारिक व्याख्यानमालेत” चाकण कला व वाणिज्य महाविद्यालयात बोलत होते.
या प्रसंगी चाकण शिक्षण मंडळाचे विश्वस्त मोतीलालजी सांकला, विश्वस्त सचिव डॉ. अविनाश अरगडे, व्याख्यानमालेचे प्रायोजक अभिमन्यू शेलार, माजी प्राचार्य श्री. सुरेशचंद्र म्हात्रे सर, रामचंद्र कड, नितीन गोरे,रामदास धनवटे, प्राचार्य डॉ. राजेश लाटणे, व्याख्यानमाला समन्वयक प्रा. डॉ. शिवाजी एंडाईत आदी मान्यवर उपस्थित होते.
वडले यांचे प्रतिपादनआपल्या भाषणात वडले म्हणाले,• “शरद जोशी साहेबांनी शेतकऱ्यांना त्यांच्या स्वातंत्र्याचा विचार दिला. शेतकऱ्यांना शेतीचे अर्थशास्त्र समजावून सांगताना त्यांनी ठामपणे सांगितले की, जर शेतीमालाला रास्त भाव मिळाला, तर शेतकऱ्यांना सरकारकडे भीक मागण्याची गरजच उरणार नाही. शेतकऱ्यांच्या आयुष्यात सरकार हीच मोठी समस्या आहे. सरकारी धोरणांमुळेच शेतकऱ्यांचे मरण होत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत, ही गंभीर शोकांतिका आहे. महाविद्यालयीन तरुणांनी या सर्व बाबींवर अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे.”व्याख्यानमालेतील इतर सत्रे व्याख्यानमालेचे उदघाटन साधना साप्ताहिकाचे प्रमुख संपादक विनोद शिरसाठ यांच्या “नवीन शैक्षणिक धोरण : एका संपादकाच्या नजरेतून” या विषयावरील व्याख्यानाने झाले. दुसरे पुष्प प्रसिद्ध गीतकार, लेखक व दिग्दर्शक अरविंद जगताप यांच्या “गोष्ट छोटी डोंगराएवढी” या व्याख्यानाने गुंफले गेले.शरद जोशींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड, नाशिक, संभाजीनगर, पुणे जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी सहकार्यया व्याख्यानमालेस यश मिळवून देण्यासाठी प्रा. डॉ. हेमकांत गावडे, प्रा. रणजित काळण, प्रा. अभिजित बेंडाले, प्रा. कैलाश अस्तरकर, प्रा. विकास देशमुख, प्रा. डॉ. सोपान घोळवे, प्रा. अजय मोरे, प्रा. मिलिंद भुजबळ, अनिकेत कदम यांचे विशेष योगदान लाभले.सूत्रसंचालन व समारोपव्याख्यानमालेचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेश लाटणे यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. डॉ. उमेश भोकसे यांनी करून दिला. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. शिवाजी एंडाईत यांनी केले, तर व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मण मलमे यांनी केले.
