
मुटके वाडी चौकात कंटेनरची कारला जोरदार धडक – सुदैवाने जीवितहानी टळली
बातमी 24तास
चाकण (योगेश गायकवाड) पुणे-नाशिक महामार्गावर अपघातांची मालिका थांबता थांबेना. आज मुटके वाडी चौकात आणखी एक गंभीर अपघात घडला. कंटेनर (क्रमांक एन.येल ०१ ए के ०१०६) ने कार (क्रमांक एमएच ३० बी येल ५१४२) ला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल झाले.स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, चालकांनी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे असे अपघात वारंवार घडत आहेत. वेळ वाचवण्यासाठी अनेक वाहनचालक ठरवून दिलेल्या यूटर्नचा वापर न करता, जिथे जागा मिळेल तिथून वाहन वळवतात. त्यामुळे महामार्गावर अचानक ट्रॅफिक जाम होतो आणि अपघाताच्या घटना वाढत आहेत.स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. विशेषत: मुटके वाडी चौकात वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलिस तैनात करणे, यूटर्नची काटेकोर अंमलबजावणी करणे व अवजड वाहनांवर लक्ष ठेवणे यासाठी मागणी होत आहे.
