
बातमी 24तास, चाकण(अतिश मेटे) श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ मोई संचलित श्री समर्थ ज्युनिअर कॉलेज, नाणेकरवाडी-खराबवाडी येथील विद्यार्थ्यांनी गणेश उत्सवानिमित्त विविध ठिकाणी सामाजिक जाणीव जागृतीसाठी पथनाट्यांचे सादरीकरण केले.श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक / अध्यक्ष श्री शिवाजीराव बबनराव गवारे सर व सचिव सौ विद्याताई गवारे मॅडम यांच्या संकल्पनेतून , त्याचप्रमाणे श्री समर्थ ज्युनिअर कॉलेज व श्री समर्थ ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था , सर्व संचालक , सल्लागार व पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने* ही पथनाट्ये चाकण पंचक्रोशीतील नाणेकरवाडी, खराबवाडी, महात्मा फुले चौक, श्री शिवाजी विद्यामंदिर, हनुमान मंदिर (खराबवाडी), सारासिटी खराबवाडी, महाळुंगे तसेच चाकण एसटी स्टँड येथे सादर करण्यात आली.अंधश्रद्धा निर्मूलन, सर्वधर्मसमभाव, सामाजिक बांधिलकी आणि महिला सक्षमीकरण हे या पथनाट्यांचे प्रमुख विषय होते. समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रभावी संदेशाचे सर्व स्तरांतून कौतुक झाले.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक स्मिता कुरळे , पूर्वी फुकून , शितल खंडागळे , सोनाली कासवा , अर्चना शेळके , शिल्पा सिंग , वनिता महाळूंजकर व सोनल शिंदे या सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले.कॉलेजच्या प्राचार्या सौ. विद्या पवार मॅडम व सीईओ सौ. अश्विनी देवकर मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच पर्यवेक्षक म्हणून सौ. अंकिता बोरकर , सौ. हसीना मनियार , सौ. अर्चना पोखरकर , दिगंबर कुलकर्णी , सौ. तेजश्री बंडगर व अजय स्वामी यांचे विशेष सहकार्य मिळाले.या पथनाट्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व जबाबदारीची भावना विकसित होत असल्याचे समाधान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

बातमी व सर्व प्रकारच्या जाहिराती साठी संपर्क :
9822372237
9922202829
9370610399