माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये चाकण नगरपरिषदने मिळविला राज्यात १०  वा क्रमांक

Share This News

बातमी 24तास Wrb News Portal

माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत भूमी,जल,वायू,अग्नी,व आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धे अंतर्गत 25 ते ५० हजार लोकसंख्येच्या गटा मध्ये चाकण नगरपरिषदेच्या समावेश होता. दिनांक ०५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने माझी वसुंधरा 3.0 अभियानाच्या अनुषंगाने कामगिरी केलेल्या नगरपरिषदांचा निकाल जाहीर झालेला आहेत. माझी वसुंधरा अभियान १.० मध्ये राज्यात १६७ वा क्रमांक , माझी वसुंधरा अभियान २.० मध्ये राज्यात ७३ वा क्रमांक व माझी वसुंधरा अभियान 3.० मध्ये राज्यात १० वा क्रमांक आलेला आहेत. चाकण नगर परिषदेने गत वर्षांच्या तुलनेत. उत्कृष्ट कामगिरी करून राज्यामध्ये दहावा क्रमांक मिळवलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy