
बातमी 24तास,
आळंदी, प्रतिनिधी अरिफ शेख : माऊलींच्या आषाढी पालखी सोहळ्यामध्ये माऊली आळंदीला आल्यावर मोठ्या प्रमाणात आळंदीत उत्साह असतो. यावेळी माऊलींची स्वागत करत माऊलींचा गजर करत आळंदीकर भाविक भक्त मोठ्या संख्येने ग्रामस्थ भाविक आळंदीच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ हातात फुले घेऊन उभे राहतात. माऊलीचा गजर करत माऊलींची पालखी मंदिरात येते आणि भुकेल्या तहाणलेल्या भाविकांना.आळंदीतील माऊली भक्तांना प्रसाद म्हणून पिठलं भाकर,शिरा व मसाले भात श्री माऊली अन्नछत्र मंडळाचे वतीने दिला जातो.
यावर्षी श्री माऊली अन्नछत्र मंडळ गणेश दरवाजा माऊली मंदिर या मंडळाला 25 वर्षे पूर्ण होत आहेत तसेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा आळंदी मुक्कामी येत आहे यासाठी मोठ्या प्रमाणात प्रसादाचे नियोजन करण्यात आलेले आहे. इतर वेळा पेक्षा जास्त प्रमाणात प्रसादाचे वाटप केले जाणार आहे अशी माहिती माजी सभापती तसेच आळंदी नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेली आहे. ज्ञानोबारायांचा जन्मशत्कोत्तर सोहळा आणि संत तुकोबारायांचा सदेह वैकुंठ गमन ३७५ वे वर्ष यानिमित्त दोन्ही पालख्या आळंदी मध्ये आल्यानंतर मोठी भाविकांची गर्दी राहणार आहे. या गर्दीमध्ये भाविकांना जास्तीत जास्त प्रमाणात माऊलींचा प्रसाद वाटप केला जावा यासाठी नियोजन माऊली अन्नछत्र मंडळाच्या वतीने केले जाणार आहे.
माऊलींच्या प्रसादाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन अन्नदाते नंदकुमार कुराडे, सुरेश भारंबे, शामकांत कोळपकर, विष्णू वहिले, अतुल लोणकर, प्रवीण लडकत, सुरेश गायकवाड, दिलीप खळतकर, अशोक मस्के, दिलीप तापकीर, अनिल ढमढेरे, अशोक लोढा, अमित कुराडे, ललित सिंघवी, नवनाथ रोकडे, सुरज भुजबळ, पंकज भारंबे, रोहन कुराडे, राजू चोपडा, राजू बाफना, राजू उगले, प्रल्हाद कुलकर्णी,सुरेश काका वडगावकर, सागर महाराज अनिल वाघमारे, आणि विनीत वहिले, यावरील सर्व अन्नदात्यांनी प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.