
बातमी 24तास
आळंदी,प्रतिनिधी अरीफ शेख
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी मोठ्या उत्साहामध्ये संत जगद्गुरु तुकोबारायांचे स्वागत करणार आहे.माऊलींचा जन्मोत्सव आणि तुकोबारायांचा सहदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त तुकोबारायांनी आळंदीला यावं असं निमंत्रण श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आले होते.आमंत्रण स्वीकारानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि समस्त ग्रामस्थ आळंदीकर, नागरिकांमध्ये यासाठी मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
आळंदी नगर परिषदेमार्फत रस्त्यावरील विविध ठिकाणी असणारे खड्ड्यांची डाग डुजी करण्यात आलेली आहे. आळंदीत असणारा कचऱ्याचा प्रश्न मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी निकाली लागल्याचे दिसून येते. ठिकठिकाणी असणारे कचऱ्याचे ढीग या पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने बऱ्यापैकी कमी झालेत आणि आता ते कायमस्वरूपी राहील अशी ग्वाही आळंदी नगरपरिषदे मार्फत मिळते.
दरम्यान मोठ्या जबाबदारीने आणि आदर भावाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ,जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीच्या स्वागतासाठी तयारी करताना दिसून येत आहे.तुकोबाराय येत आहेत.
माऊलींच्या भेटीला… अशा आशयाची कार्यक्रम पत्रिका श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने प्रसारित करण्यात आली असून,त्यामध्ये सायंकाळी पाच वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन. सायंकाळी सहा ते सहा वाजून तीस मिनिटांनी मंदिरात होईल ..नगर प्रदक्षिणा, श्रींच्या पादुकांचे गाभाऱ्यात स्थापित होत सेवेकरी मानकरी सन्मान.होईल नंतर, सायंकाळी सात वाजता जगद्गुरु श्री संत तुकोबा राय महाराज यांचे आगमन त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील कारंजा मंडपामध्ये दाखल होऊन आरती होईल, आणि संत तुकोबारायांच्या पादुका माऊलींच्या गाभाऱ्यात भेटीसाठी नेण्यात येण्यात येतील असे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल आहे.
आळंदीकर ग्रामस्थ वारकऱ्यांमध्ये या ऐतिहासिक निर्णयामुळे मोठे आनंदाचे वातावरण असून.ज्ञानोबा तुकोबा वर्षानुवर्ष होणारे हे भजन खऱ्या अर्थाने या दिवशी आळंदी मध्ये एकत्रित, एकरूप होताना आळंदीकर ग्रामस्थ पाहणार आहेत.यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीला या पुण्याचं भाग्य नागरिकांच्या मार्फत देताना समाधान व्यक्त केले जात आहे.