
बातमी24तास(प्रतिनिधी,अतिश मेटे)
चाकणमधील तीव्र वाहतूक समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात, या मागणीसाठी “ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समिती ” लोकशाही मार्गाने आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
तळेगाव चौकातील पोलीस चौकी परिसरात नागरिकांच्या एकजुटीने करण्यात आले त्यानंतर सर्व सहभागी आंदोलक शांततेत, झिकझाक पद्धतीने रस्त्याच्या दुभाजकावर उभे राहून आणि आपल्या हक्कासाठी फलक माध्यमातून निदर्शने करण्यात आले.
आंदोलन पूर्णपणे शांततेत पार पडले. कोणत्याही वाहनाला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी कृती समिती कडून घेण्यात आली.“ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समिती” च्या पुढाकाराने पुन्हा एकदा चाकणकर एकवटले असून, शासन आणि प्रशासनाला स्पष्ट संदेश देण्यात आला की नागरिकांचा संयम संपला आहे. शासनाने लवकरात लवकर निर्णयघेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथाआंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे, मावळ चे आमदार सुनील शेळके,आमदार माऊली आबा कटकेयांनी विधानसभा आवारात ” सरकार जागे व्हा चाकणची वाहतूक कोंडी सोडवा ” अशा प्रकारचा पोशाख परिधान करून एक आगळे वेगळे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. आंदोलनास शेतकरी, व्यापारी, डॉक्टर, कामगार विद्यार्थी तसेच विविध शेत्रातील मान्यवरानी उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा दिला.