तीर्थक्षेत्र आळंदी मध्ये इंद्रायणी नदीला खूप मोठ स्थान आहे. इंद्राच्या अपरंपार जपतपाने या नदीचे देव इंद्राच्या नावाने इंद्रायणी पडले. माऊलींचा समाधी सोहळा आता तोंडावर आहे.त्याचबरोबर निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये मात्र इंद्रायणी नदी पुन्हा एकदा दूषित पाण्याने फेसाळली असून भाविक वारकरी भक्त हळहळ व्यक्त करत आहे.वेगवेगळे आंदोलने झाली, उपोषणे झाले,मात्र इंद्रायणीचा श्वास मात्र गुदमरलेलाच आहे.या इंद्रायणी मातेचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन केले जाते.मागील काळामध्ये प्रशासनाने कारवाई करून सुमारे सहा कंपन्या ज्या इंद्रायणी प्रदूषित करतात त्यांच्यावर दोषारोप ठेवलं होते.त्याचबरोबर इंद्रायणी नदीच्या आजूबाजूला असणारी गाव यांनी इंद्रायणी नदी मध्ये सांडपाण्याचा प्रवाह तसाच सुरू ठेवल्याने दूषित दुर्गंधीयुक्त इंद्रायणी नदीचे पाणी झालेले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करून ही प्रदूषण महामंडळ मात्र डोळे झाकून गप्प आहे.अशा परिस्थितीमध्ये नेमकी दाद मागायची कुणाकडे,अशी स्थिती निर्माण झालेली दिसते.मुळात प्रशासन सर्वतोपरी ताकत लावून सुद्धा, इंद्रायणी मात्र प्रदूषित होते.आणि अचानक नदीचे पाणी फेसाळलेले दिसून येते.गेल्या दोन-चार दिवसापासून इंद्रायणी नदीमध्ये पुन्हा फेस युक्त थर जमा होऊ लागलेल्या आहेत. सुमारे दोन-तीन महिन्यापासून इंद्रायणी नदीत स्वच्छ जल पाहायला मिळत होते.मध्यंतरीच्या काळामध्ये जोरदार पावसामुळे हे प्रदूषित पाणी दिसेनासे झाले होते.मात्र दरम्यानच्या काळात पाऊस थांबल्याने नदी प्रवाह तुरळक प्रमाणात आहे.त्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात फेस हा संपूर्ण इंद्रायणी नदीला व्यापून टाकताना दिसत आहे.याबाबत ठोस कारवाई का होत नाही, आरोपी मोकाट कसे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण करण्याचे पाप कोणाच्या माथी माराव हाही प्रश्न निर्माण होत आहे.येणाऱ्या काळामध्ये हे प्रदूषण थांबलं नाही, तर मोठ्या प्रमाणात या दूषित पाण्याने होणाऱ्या रोगाने आळंदी हादरेल हे मात्र नक्की.