औद्योगिक भागात पिस्टल घेऊन फिरणारा विधी संघर्षित बालक अटकेत,अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

Share This News

बातमी24तास(वृत्त सेवा) पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना दि. 29/10/2024 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेकडील सपोनि सचिन कदम, पोलीस हवालदार मयुर वाडकर, पोलीस नाईक विजय दौंडकर, प्रसाद कलाटे व पोलीस शिपाई निखिल वर्पे असे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना विजय दौंडकर व निखिल वर्पे यांना मिळालेल्या बातमीवरून विधी संघर्षित बालक यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून एकूण 52000/- किमतीचे देशी बनावटीचे मॅक्झिन नसलेले पिस्टल व 2 जिवंत काडतूसे जप्त करण्यात आले असुन त्याचेविरुध्द संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy