किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले श्री संग्रामदुर्ग येथे विजयादशमीनिमित्त शस्त्र पूजन

Share This News

बातमी 24तास (वृत्त सेवा)

किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले श्री संग्रामदुर्ग येथे दिनांक 12/10/2024 रोजी विजयादशमीनिमित्त शस्त्र पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

सदर शस्त्र पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची आरती चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रमोद वाघ किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे संस्थापक/ अध्यक्ष ॲड. किरण दशरथ झिंजुरके, पोलीस उपनिरीक्षक घार्गे ,मोरे तसेच संदीप बोरकर यांच्या वतीने करण्यात आली. सदर कार्यक्रमाला योगेश साखरे, विजय जगनाडे, शैलेश कड, ऋषिकेश बुचुडे, गणेश कड, अनंत देशमुख, अरुण शेठ जाधव, भाऊसाहेब वनवे, मुरलीधर मंडलिक,राहुल वाडेकर, राजीव दीक्षित सर, बाबासाहेब दिघे, किशोर परदेशी, नामदेव पानसरे, तसेच पत्रकार, चाकण पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ तसेच सर्व किल्लेदार महिला व किल्लेदार पदाधिकारी उपस्थित होते.सायंकाळी5.00 वाजता सिमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला व तदनंतर श्री दामोदर व शिवरायांची आरती होऊन शिव वंदना घेण्यात आली व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy