तालुक्याचा विकास आणि दहशत मोडायची असेल तर युवा उमेदवार अक्षय जाधव यांना संधी द्या : भगवान पोखरकर (जिल्हा प्रमुख शिवसेना शिंदे गट )

Share This News

मी आपल्या आशीर्वादावर आमदारकीचा उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभा, तुमचा कोणताही शब्द खाली पडून देणार नाही, मायबाप जनतेने तुमचा मुलगा,भाऊ म्हणून मला साथ द्या: अक्षय जाधव

बातमी 24तास,(वृत्त सेवा) अश्वमेघ फाऊंडेशन आयोजित शिवसेना पुणे जिल्हा संघटक अक्षय जाधव यांच्या पुढाकाराने RJ अक्षय with कॉमेडी नाईट्स आणि खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमा निमित्त सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे व सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती प्रमुख आकर्षण ठरले.या कार्यक्रमासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे,शिंदे गट शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, युवा सेना पुणे जिल्हा प्रमुख धंनजय पठारे, उपतालुका प्रमुख दत्ता भाऊ राऊत,उपतालुका प्रमुख अंबर सावंत, युवती सेना प्रमुख आरती कांबळे,राजगुरूनगर शहरप्रमुख नयना झणकर, विभाग प्रमुख समाधान पानसरे,विभाग प्रमुख अनिल कौदरे, युवा नेते जालिंदर पोखरकर, वैभव हुंडारे, अक्षय मुळूक, यश राखूडे, भरत मोरे, सौरभ जैद, मंगेश मुळूक, अविनाश मुळूक, यशराज तनपुरे, अनिकेत नाईकडे,बंटी हुंडारे, मनोज मुळूक, स्वप्नील मुळूक, सतीश तनपुरे आदी.पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy