पिंपरी चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी,विक्रीकरिता अग्निशस्त्र (पिस्टल)घेऊन फिरणारा इसम अटकेत

Share This News

बातमी 24तास,(वृत्त सेवा)

म्हाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना एका तरुणाकडून पिंपरी चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेने देशी बनवटीचे एक पिस्टल जप्त केले.

दि 11/09/2024 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेकडील सपोनि विक्रम गायकवाड, पोलीस हवालदार मयुर वाडकर, किशोर परदेशी, पोलीस नाईक विजय दौंडकर, निखिल शेटे व पोलीस शिपाई निखिल वर्पे असे म्हाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार निखिल वर्पे व निखिल शेटे यांना मिळालेल्या बातमीवरुन इसम नामे शुभम उर्फ शंभु राजेश गायकवाड, वय 19 वर्षे, रा घडई मैदान, साई व्हिला सोसायटी शेजारी, राजगुरुनगर ता खेड जि पुणे यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन एकुण 50,000/- रुपये किंमतीचे देशी बनावटीचे लोखंडी पिस्तल जप्त करण्यात आले असुन त्याचेविरुध्द म्हाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy