आपल्या जन्मभुमीत आपण काहीतरी केले पाहिजे,आपल्या गावातील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन आपल्या गावाचा नावलौकिक कसा वाढेल याकडे लक्ष दिले ग़ेले पाहिजे,व आपल्या मूळ जन्मभूमिला विसरू नये अशी आमच्या वडिलांची अशी इच्छा होती. या उद्देशाने त्यांचे बंधु आणि त्यांनी श्री विठ्ठल रखुमाई शिक्षण प्रसारक मंडळ प्रशालेची स्थापना केली,तोच वसा आणि वारसा घेऊन आम्ही या प्रशालेतील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन जास्तीत-जास्त गुणवंत विद्यार्थी कसे घड़तील यासाठी आमचा प्रयत्न आहे.अशी भावना संस्थेचे अध्यक्ष किरण मांजरे यांनी व्यक्त केली .
श्री विठ्ठल रखुमाई शिक्षण प्रसारक मंडळ,कै.वसंतराव मारुतराव मांजरे विद्यालय,मांजरेवाडी.ता.खेड,जि.पुणे. येथे स्व.वसंतराव मा.मांजरे(मा.आमदार)यांचा ३२ वा,स्व.शंकरराव मा.मांजरे(संस्थापक,अध्यक्ष) यांचा २० वा, व पोपटराव मा.मांजरे यांचा १३ वा स्मृतिदिन,गुणवंत आजी-माजी विद्यार्थी गुणगौरव व वृक्षारोपण समारंभ शनिवार,दि.१९/८/२०२३ रोजी सकाळी १०:३० वा.मांजरेवाडी येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी ह.भ.प.रंगनाथ महाराज नाईकडे(I.F.S.)मुख्य वनरक्षक,(प्रादेशिक)नागपूर, ह.भ.प.आचार्य हरिदास महाराज पालवे(संस्थापक-अध्यक्ष,श्री वृध्देश्वर गुरुकुल शि.सं.आळंदी)के.डी.गारगोटे(C.A.)अध्यक्ष,सेवा प्रतिष्ठान,पुणे हे प्रमुख पाहुणे होते.कार्यक्रमाची सुरवात वृक्षारोपन करून झाली.
ह.भ.प.पालवे महाराजांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले गुन्हेगारी कमी झाली पाहिजे त्यासाठी गुन्हेगाराला गुन्हा घडुन शिक्षा होण्यापेक्षा गुन्हा घडूच नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे.ह.भ.प.नाईकडे महाराजांनी विद्यार्थ्यांनी UPSC,MPSC चा दृष्टिकोण डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास केला पाहिजे,शिक्षण घेताना शिक्षणाचा पाया भक्कम असला पाहिजे,तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड असेल त्या क्षेत्रात तुम्ही भरारी घ्या,परंतु आपण जन्मभुमित जन्मलो,शिकलो त्या जन्मभुमिला विसरु नका,असे शिक्षण परदेशात केव्हाही दिले जात नाही. ते फक्त आपल्या राष्ट्रातच दिले जाते,हे ही विसरून चालणार नाही.महाराजांनी दिलेले तीन मंत्र…१)कष्टाला पर्याय नाही.२)यश प्राप्ती करावयाची असेल तर,ज्ञानाशिवाय पर्याय नाही.३)सकारात्मक दृष्टिकोण विचारसरणी.कार्यक्रमाच्या उपस्थितांमध्ये होलेवाडीच्या सरपंच मोनिका होले व मांजरेवाडीच्या सरपंच अनिता मांजरे,प्रशालेचे उपाध्यक्ष काळुराम मांजरे,सचिव मुरलीधर मांजरे,संचालक बाळासाहेब वसंतराव मांजरे,बाबुराव मांजरे,साळुबाई मांजरे,पार्वतीबाई मांजरे विलास बबन मांजरे,तुषार सुरेश मांजरे,महेंद्र मांजरे,ह.भ.प.मुक्ताज़ीदादा नाणेकर,राजगुरुनगर सह.बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल,सतीश नाईकरे,विनायक घुमटकर,बाळासाहेब सांडभोर,राजन जांभळे,मिलिंद शिंदे,गुलाबराव पठारे,अप्पासाहेब पोतेकर,नंदकुमार अभंग,लक्ष्मण नाणेकर,श्रीरंग मेदनकर,निलेश टिलेक़र,चंद्रकांत गोरे,सुभाष गरग़ोटे,सचिन मांजरे,किरण नंदकुमार मांजरे,निलेश पठारे,योगेश आगरकर,अमोल जगनाडे सर्व मांजरेवाडीतील ग्रामस्थ,महिला सर्व शिक्षक,शिक्षकेतर वृंद,आजी-माजी विद्यार्थी इतर मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुरलीधर मांजरे यांनी तर आभार प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णुपंत मेदगे यांनी केले.