(प्रतिनिधी, सम्राट राऊत) जिल्हा शिक्षण व परीक्षण संस्था पुणे, पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती खेड यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुका गुणवत्ता कक्षाची मिटिंग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणेकरवाडीच्या सभागृहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय नामदेव शेंडकर, अधिव्याखाता( DIET)होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षण विस्ताराधिकारी जीवन कोकणे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणेकरवाडीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याचा सन्मान आदरणीय मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक संदिप महादू नाणेकर, सौ.अनिता संजय सांगळे, श्रीमती सोनाली पांडुरंग जाधव सौ.वैशाली संतोष तळोले, प्रवीण नाना पाटील यांचा सन्मान सुमारे 5000 रुपये किमतीची सुवर्ण प्रतिमा फ्रेम, ट्रॉफी देऊन करण्यात आला.
प्रमुख मार्गदर्शनामध्ये माननीय विकास गरड, अधिव्याख्याता (डायट )पुणे गुणवत्ता विकासातील अडचणी- उपाय आणि पुढील वाटचाल या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. खेड तालुक्याच्या (डायट पुणे) संपर्कप्रमुख राजश्री तिटकारे यांनी आपले विचार व्यक्त केले. खेड तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेताना भविष्यातील नियोजन आणि कृती कार्यक्रम यावर आधारित समग्र मार्गदर्शन गटशिक्षणअधिकारी माननीय अमोल जंगले यांनी केले. यापुढे दर महिन्याला तालुक्याची मीटिंग तसेच केंद्र पातळीवरील मिटींगचे आयोजन होणार आहे. सदर मीटिंग साठी 7 विस्तार अधिकारी 36 केंद्रप्रमुख 12 BRCस्टाफ, मा मंगेश पावडे ,नामदेव गवळी, शुभम खिलारे ,प्रवीण कांबळे, मुख्याध्यापक श्री संदिप नाणेकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय शिवले यांनी केले तर आभार हिरामणदादा कुसाळकर यांनी मानले.