(प्रतिनिधी,कमलेश पठारे) भिमाशंकर अभयारण्य घाटमाथ्यावर मागील दोन आठवडे पासून वरुणराजा सक्रीय झाल्याने खेड तालुक्यातील (जि.पुणे) चासकमान धरण 93 टक्के भरल्याने शुक्रवार दि. 28 जुलैला सायंकाळी 5 वाजता धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले.3 हजार 850 क्युसेसने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्कता बाळगावी तसेच नदीवरच्या पुलासह कोल्हापुरी बंधाऱ्याचा वापर शक्यतो टाळण्याचे आवाहन प्रांतधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी केले आहे.गतवर्षी 16 जुलैला चासकमान धरण 100 टक्के भरले होते. भामाआसखेड धरण आता 70 टक्क्यावर पोहचले आहे. त्यामुळे आता खेड तालुक्यातील भामा आसखेड वगळता कळमोडी, चासकमान ही दोन्ही धरणे ओसंडून वाहत आहेत. संततधार पाऊस असतानाही भामाआसखेड धरणात फक्त 70 टक्के पाणीसाठा आहे.खेड तालुक्यातील पश्चिम भागात दमदार पाऊस सुरु आहे.
चासकमान (Khed) धरण, कळमोडी धरण पाणलोट क्षेत्रात जलोत्सव सुरू झाला आहे.चासकमान धरणातंर्गत असणारे कळमोडी धरण 18 जुलैला शंभर टक्के भरल्याऩंतर पश्चिम भागात भिमाशंकर अभयारण्य परीसरात संततधार पावसाने दमदार हजेरी लावल्याने चासकमान धरण 15 दिवसात 93 टक्क्यावर पोहचले. त्यानंतर भिमानदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे . गतवर्षी 16 जुलैला चासकमान धरण 100 टक्के भरले होते. खेड तालुक्यातील भामाआसखेड धरण 70 टक्क्यावर पोहचले आहे.