बातमी 24तास
आज श्री शिवाजी विद्यामंदिर व सि.भि.पाटोळे क.महाविद्यालय चाकण येथे जागतिक योगदिन साजरा करण्यात आला.त्यावेळी प्रशालेची माजी विद्यार्थिनी कु.गौरी गोरे व त्यांचे सहकारी सतीश बहिरट यांनी विद्यार्थ्यांना योगदिनाचे महत्त्व सांगितले व त्यांचेकडून प्रात्यक्षिक करून घेतले.यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक व संस्था प्रतिनिधी अनिल ठुबे,संस्थेचे खजिनदार श्रीमती गोरे के.के. ,ग्रामीण संचालक रामदास खाटमोडे,प्रशालेचे उपप्राचार्य तुकाराम थोरात,ज्येष्ठ शिक्षक रवींद्रनाथ नवले व सर्व सहकारी अध्यापक,अध्यापिका उपस्थित होते.