(प्रतिनिधीआरिफशेख) आळंदीकरांना सुमारे पाच दिवसाच्या विलंबानंतर आलेल्या पाण्याला कडवटपणा आल्याचे जाणवत होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आमचे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी त्याबाबत आळंदी नगर परिषद पाणीपुरवठा विभाग प्रमुख शितल जाधव यांना सदर बाबत कल्पना दिली. त्यावेळी पाणीपुरवठा विभाग प्रमुख शितल जाधव यांनी त्याबाबत त्वरित चौकशी केली यावेळी सदर पाणी कडवटपणा कशामुळे आला आहे याची माहिती घेतली असता. असे निदर्शनास आले की पाण्यामध्ये क्लोरीन डोस हा जास्त प्रमाणात पडला गेला त्यामुळे सदर पाण्याला कडवटपणा आलेला आहे पाणीपुरवठा विभागाची कर्मचारी यांना त्याबाबत त्वरित सूचना देत पुढील पाणीपुरवठ्यामध्ये सदरच्या प्रमाणे डोस नियमित करणे कामी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे आणि पाणीपुरवठा प्रमुख शितल जाधव यांनी सूचना दिलेल्या आहेत. सदर बाबत जागरूक राहून ही बाब नगर परिषदेच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे होते. त्यामुळे सदर बाबी बाबत विचारणा केली आणि आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे आणि पाणीपुरवठा विभाग प्रमुख शितल जाते यांनीही कार्य तत्परता दाखवत त्यामध्ये सुधारणा केली आहे सदरचा क्लोरीन डोस हे प्रमाणित करण्यात आल्यानंतर नेहमीसारखे पाणी येईल आणि पाण्याला कडवटपणा राहणार नाही याची दक्षता घेतलेली आहे अशी ग्वाही आळंदी नगरपरिषद पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून देण्यात आली आहे.