“अमृत जलधारा  पाणी पुरवठा योजनेचा पाठपुरावा मी केला श्रेय कोणीही घ्या” माजी उपसरपंच तथा पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष कालीदास वाडेकर.

Share This News

बातमी 24तास Web News Portal (प्रतिनिधी,विजयकुमार जेठे)

चाकण शहराची वाढती लोकसंख्या,औद्योगिकीकरण व शहराचा होणारा विस्तार लक्षात घेऊन अमृत २.० कार्यक्रमाअंतर्गत चाकण शहर पाणीपुरवठा योजनेच्या १६५ कोटी ६७ लक्ष रकमेच्या प्रकल्प आराखड्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने नुकतीच तांत्रिक मंजूरी दिली आहे. यासाठी मीच प्रयत्न केला आहे. असे ठाम वक्तव्य चाकणचे माजी सरपंच व भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष कालीदास वाडेकर यांनी चाकण येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.यावेळी वाडेकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे मुख्य अभियंता रा. सा. राहाणे यांच्या सहीचे पत्र सादर केले चाकण शहराची वाढती लोकसंख्या,औद्योगिकीकरण व शहराचा विस्तार लक्षात घेऊन पाणी पुरवठा योजना करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत ७ डिसेंबर २०२१ रोजी रू ६५ कोटी रकमेच्या चाकण पाणीपुरवठा योजनेस मंजुरी दिली होती. सदर कामाची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली होती. मात्र या योजनेसाठी गृहीत धरलेला लोकसंख्या निकष सदोष असल्याचे लक्षात आल्यानंतर भविष्यात अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या गंभीर समस्येला चाकणकरांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता दिसू लागली. त्यामुळे तातडीने राज्य शासनाकडे आग्रही मागणी करुन सदर निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आलीचाकण शहरासाठी पाणी पुरवठा योजना राबवण्यासाठी मी २०१६ पासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे.या योजनेला राज्य शासनाने तांत्रिक मंजुरी दिली असल्याचे पत्र मला देण्यात आले आहे.परंतु काही लोक याचे श्रेय घेण्यासाठी धडपडणाऱ्या कोणाचेही नाव न घेता भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर म्हणाले “पाठपुरावा मी करतो श्रेय कोणीही घ्या “असा खोचक टोला लगावला. अमृत जलधारा पाणी पुरवठा योजनेसाठी चाकणकर नागरिकांना सांगण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची आता चढाओढ सुरू झाली आहे.यांच्या राजकीय हेव्यादाव्यांत पाणी पुरवठा योजना पुन्हा एकदा बारगळणार तर नाही ना अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. चाकण शहरातील पाणी पुरवठ्याचे सध्याच्या परिस्थितीत तीनतेरा वाजले आहेत.एक दिवसाआड शहराला पाणी पुरवठा करण्यात येत आहे.भामा आसखेड धरणात तसेच भामा नदीत मुबलक प्रमाणात पाणी असूनही धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. यामुळे पालिकेच्या प्रशासन आणि प्रशासकांबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.पाणी पुरवठ्यावर उपाययोजना करण्याची गरज असताना.सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते नुकतीच तांत्रिक मंजुरी मिळालेल्या अमृत जलधारा पाणी पुरवठा योजनेसाठी आम्हीच कसा आणि किती पाठपुरावा केला आहे याचे श्रेय घेऊन सोशल मीडियासह पत्रकार परिषद घेऊन आणि प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना हाताशी धरून बातम्या प्रसिद्ध करण्याचा धडाका लावला आहे. दरम्यान,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांचे दालनात बैठक घेऊन या योजनेचा अमृत २.० मध्ये समावेश करण्याच्या दृष्टीने अंदाजपत्रक करण्याचे निश्चित केले. याबाबत मागील चार महिन्यांपासून पंचायत समितीचे माजी सभापती व सदस्य, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, जिल्हासंघटक अशोक भुजबळ, स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे,चाकण नगरपरिषदचे मुख्याधिकारी, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचे वरीष्ठ अधिकारी तसेच मंत्रालयात वारंवार बैठका घेऊन पाठपुरावा केल्याचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले. त्यानुसार तांत्रिक प्रक्रिया पूर्ण घेऊन नुकतीच १६५ कोटी ६७ लक्ष रकमेस मुख्यअभियंता, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांनी तांत्रिक मान्यता दिलेली आहे. सदर योजना मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सादर करण्यात आली असून योजनेची उर्वरित मंजुरी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होऊन या महत्वकांक्षी पाणी योजनेला मंजुरी मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ कार्यवाहीचे निर्देश संबंधित विभागाच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

चौकट

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत ७ डिसेंबर २०२१ रोजी रू ६५ कोटी रकमेच्या चाकण पाणीपुरवठा योजनेस मंजुरी दिली होती. सदर कामाची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली होती. मात्र या योजनेसाठी गृहीत धरलेला लोकसंख्या निकष सदोष असल्याचे लक्षात आल्यानंतर भविष्यात अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या गंभीर समस्येला चाकणकरांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता दिसू लागली. त्यामुळे तातडीने राज्य शासनाकडे आग्रही मागणी करुन सदर निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy