बातमी 24तास Web News Portal
(प्रतिनिधी आरीफभाई शेख)
आळंदी येथील एक विकृत प्रकार उघडकीस आला आहे. आळंदी ही पुण्यभूमी आहे आणि येथे देव धर्म याला एक वेगळी उंची आहे. तसे पाहिले तर आळंदीतील तृण मृण पाषाण सर्व देवत्वाला प्राप्त आहेत. म्हणजे सर्वच पवित्र आहेत. परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी शेंदूर फासून खोटा हार घालून. देव उभा करणे. किती योग्य आहे याची चर्चा सुरु असलेची प्रचिती येत आहे. आळंदीतील राजगुरुनगर सहकारी बँकेच्या शेजारील कंपाऊंडच्या भिंतीला स्थानिकांनी.कचरा टाकू नये यासाठी शक्कल म्हणून देवाचा धार्मिक वापर केला आहे.एका दगडाला शेंदूर फासून हार घालत फरशीवर बसून तेथे देव असल्याचे भासवले आहे. हा खोटा देव उभा करून, लोक कचरा टाकायचे थांबतील अशी अपेक्षा ठेवणं कितपत योग्य आहे, आणि त्यासाठी देवाचा धार्मिकतेचा उपयोग करून घेणे किती योग्य आहे हा संशोधनाचा भाग आहे.त्याचबरोबर अतिशय खालच्या स्तराला भाषा वापरून जो कचरा टाकेल त्याच्या कुटुंबातील स्री बाबत अशोभनीय भाषेचा वापर करत.त्याखाली कचरा टाकू नये असा उल्लेख केलेला आहे.मुळात संस्कृती आणि धर्म याची ओळख आळंदी मध्ये आहे. अशा खालच्या थराला जाऊन केलेल्या भाषेचा वापर हा इतर शालेय मुलं आणि संस्कारी माणसांच्या संस्कार वर परिणाम करणारा ठरू शकतो. याची पण हे कृत्य करणाऱ्यांना भान राहिलेले दिसत नाही.मुळात स्वतःच्या स्वार्थासाठी दगडाला देव करून उभे करण्यापेक्षा त्याबाबत दंडात्मक कारवाई करत .हा प्रकार रोखणे. कचरा टाकू न देणे. कचरा टाकणाऱ्याला शासन करणे. हे जमू शकले असते. परंतु तसे न करता असभ्य भाषा आणि दगडाला शेंदूर पासून देव निर्माण करणे. किती योग्य आहे याची सर्वत्र चर्चा सुरू आहे