स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे वतीने राजगुरूनगर येथे निदर्शने

Share This News

बातमी 24तास, राजगुरूनगर

८ फेब्रुवारी – तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचा निषेध म्हणून काल दि. 13-02-2026 रोजी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे कार्यकर्ते राजगुरूनगर येथे निदर्शने करण्यात आली.महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना हा केवळ एका व्यक्तीचा अपमान नाही, तर सामाजिक समतेच्या विचारांवर हल्ला आहे, असे निदर्शकांचे म्हणणे आहे.

दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखने यांनी या घटनेचा निषेध केला असून, पोलीस प्रशासनाकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर झालेला हल्ला हा सामाजिक समतेच्या मूलभूत भावनेवर हल्ला आहे जर लवकरात लवकर कारवाई करण्यात आली नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहे ,” असे देखने म्हणाले .निदर्शकांनी पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कडक कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बबनराव पाटोळे यांनी सांगितले की समतेचा विचार सोबत घेऊन चालणारे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्यावर हल्ला म्हणजे देशातल्या सर्व सामान्य घटकावर झालेला हा हल्ला आहे. राज्य सदस्य दिलीप पालवे की जर दोशींला कठोर शिक्षा व्हावी यासाठी संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात येईल यावेळी दर्शनाचे आयोजन विकास शिंदे आणि संस्थापक अध्यक्ष हरीश भाई देखने राज्य उपाध्यक्ष बबनराव पाटोळे राज्य सदस्य दिलीप पालवे, अलकाताई गुंजाळ पुणे जिल्हा संपर्कप्रमुख विकास शिंदे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विनोद हिवराळे सोनू काळे, खेड तालुका पश्चिम विभाग कार्याध्यक्ष राहुल रोकडे रेखाताई कोळेकर चतुरा वायदंडे पवार शितल पवार सपना रोकडे मीरा पवार अतुल देखने इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy