बातमी24तास,आळंदी(अरिफ शेख) श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी.आळंदी नगरपरिषद आणि समस्त ग्रामस्थ आळंदीकर यांचे वतीने इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त स्वच्छता अभियान नुकतेच राबवले गेले.मोठ्या श्रमदानातून आळंदी नगरपरिषद,श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान,आणि आळंदीकर ग्रामस्थ यांचे विशेष योगदान या स्वच्छते मोहिमेमध्ये आहे. मोठ्या श्रद्धेच्या वातावरणात ही स्वच्छता मोहीम राबवली गेली.मोठा सहभाग पाहता ,याबाबत कौतुक व्यक्त करत असताना मात्र इंद्रायणी नदीचे मूळ प्रदूषण स्रोत याबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे वाटते.मुळात आळंदी इंद्रायणी नदी मध्ये मोशी, डुडुळगाव, इंद्रायणी नगर ,चिखली, चिंबळी, केळगाव, या आणि इतर लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्तीचे वाढते प्रमाण पाहता त्यांचे मला मिश्रित दूषित पाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडले गेलेले आहे. काही कंपन्यांची ही रसायनयूक्त पाण्याची विल्हेवाट याच इंद्रायणीत लावली जाते.याचाच परिणाम म्हणून आळंदीच्या पवित्र इंद्रायणीला विषारी द्रव्य प्राप्त होऊन,फेस युक्त पाणी येत आहे.आता मात्र आळंदीकर नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना एक मोठ्या वेदनेला सामोरे जावे लागत आहे. विषारी पाणी नंतर आता विषारी हवा हे नवीन संकट नागरिकांच्या डोक्यावर दिसत आहे.आळंदीत संध्याकाळी सहा वाजले नंतर आळंदीच्या इंद्रायणी नदीकाठी असणारे व्यापारी आणि नागरिकांना अक्षरशः उलटी येईल अशा दर्प उग्र वासाने हैराण केले आहे.दिवसा असणारी वाहती हवा आणि ऊन यामुळे सदरचा वास येत नसला,तरी नेहमी इंद्रायणी काठी सहवास असणारे व्यापारी, पर्यायाने इंद्रायणी नदीवरून येणारी हवा चा प्रवाह ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी राहणारे नागरिक. यांना एका वेगळ्याच उग्र दर्पाचा सामना करावा लागत आहे.अक्षरशा जेवण ही जात नाही.अशी स्थिती या ठिकाणी आहे.मुळात इंद्रायणी नदीच्या प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या मुख्य फांद्या या तोडल्याशिवाय यातून तोडगा निघणार नाही.अशी नागरिकांची भावना पाहायला मिळते.स्थानिक इंद्रायणी नदीच्या लगत असणाऱ्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर व्यापारी आणि रहिवासी यांना या उग्र वासाचा खूप मोठा त्रास जाणवत आहे. बऱ्याच नागरिकांनी जेवणावरची वासना उडून गेल्याची भावना व्यक्त केली आहे.मुळात नागरिकांचे आरोग्य दूषित हवेमुळे धोक्यात आलेले आहे.पूर्वी असणारे विषारी पाणी आणि आता नवीन संकट प्रदूषित हवा यामुळे नागरिक अहवाल दिल झालेले दिसतात.तसेच व्यापारी ही मोठे त्रस्त झालेले आहेत.आळंदी नगर परिषद,श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान ,यांना आळंदी नागरिकांकडून याबाबत ठोस उपाययोजना करण्याची विनंती करण्यात येत आहे.मुळात इंद्रायणी प्रदूषित फेस युक्त पाणी यातून इंद्रायणी नदी मुक्त केंव्हा होईल याची दीर्घ प्रतीक्षा नागरिक करीत आहेत.कारण बऱ्याच तक्रारी झाल्या, आंदोलने झाली,परंतु इलाज मात्र झाला नाही.अशी परिस्थिती असताना नागरिक मात्र उग्र दर्पाच्या विषारी हवेचा इलाज करावा याची मागणी करताना दिसत आहे.