खुनाच्या गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून आरोपी व विधीसंघर्षीत बालक ताब्यात घेवुन खुनाचा गुन्हा केला उघड
बातमी24तास (वृत्त सेवा)
दिघी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि.०५/१२/२०२४ रोजी सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान काळेवाडी, च-होली बु., ता. हवेली, जि. पुणे येथे सचिनकुमार लखीदर राय वय.२३ वर्षे, रा. बंगरी, जि. मुझफ्फरपुर, बिहार यास कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी अज्ञात कारणासाठी धारदार शस्त्राचे सहाय्याने वार करून जीवे ठार मारले होते. याबाबत दिघी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ५३३/२०२४ भा.न्या.सं. कलम १०३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
सदरचा गुन्हा घडताच वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळावर भेट देवून गुन्हे शाखा, पो.स्टे. गुन्हा उघडकीस आणण्याकरीता सुचना केल्या. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण व खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर घटनास्थळी भेट देवून सीसीटीव्ही फुटेज चेक करून सीसीटीव्ही फुटेजमधील अनोळखी इसमाचे वर्णनावरून आरोपीचे नाव निष्पन्न केले. तसेच पो.ह. १०७१ आशिष बोटके यांना मिळालेल्या बातमीवरून व सपोफौ सुनिल कानगुडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून नमूद दाखल गुन्ह्यातील पाहीजे मुख्य आरोपी हा काळाखडक, पुणे येथे असल्याची माहिती मिळताच सदरचे बातमीचे अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण हे त्यांचे सहकारी व बातमीदारासह काळाखडक, वाकड येथे जावून पाहिले असता आरोपी सार्वजनिक रोडचे कडेला उभा दिसल्याने त्यास स्टाफचे सहाय्याने पहाटे ०३/१० वा. चे सुमारास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव, पत्ता गौतम रामानंद राय वय.२२ वर्षे रा. फ्लॅट नं.०६, तेजस रेसीडन्सी, मंगलनगर, नेल नं.०८, वाकड, पुणे मूळगाव मु. बंगरी पो. मरवन ता. काटी जि. मुजफ्फरपूर, राज्य-बिहार सांगितले. तसेच त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा मित्र विधीसंघर्षीत बालकाचे साथीने माझ्या कौटुंबिक वादाच्या कारणाने केला असल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक चौकशी करून विधीसंघषीत बालक हा मोहीतेवाडी, ता. मावळ, जि. पुणे येथे गेले असता तो राहते घरी मिळून आल्याने विधीसंघर्षीत बालक वय. १७ वर्षे, ०६ महीने रा. मोहीतेवाडी, ता. मावळ, जि. पुणे मूळगाव मु.पो.यंडी, जि. विजापूर, कर्नाटक असे सांगितले. त्यास सकाळी ०८/०० वा. चे सुमारास ताब्यात घेण्यात आले आहे. सदरचे निष्पन्न आरोपी गौतम रामानंद राय व विधीसंघर्षीत बालक यांना पुढील कारवाईकामी दिघी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त, डॉ. शशिकांत महावरकर,अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) बाळासाहेब कोपनर, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहाय्यक पोलीस फौजदार सुनिल कानगुडे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर कुन्हाडे, मंगेश जाधव तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पो. अंम. नागेश माळी यांचे पथकाने केली आहे.