बातमी 24तास (वृत्त सेवा ) दिनांक ०१/१२/२४ रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा मध्ये हत्येचा आरोप असलेल्या न्यायालयीन बंदी जितेंद्र पांडुरंग घोलप ह्याने वाघोली येथील परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्तात जाऊन परीक्षा दिली आहे, त्याच्यावर ओतूर पोलिस ठाण्यात एका २० वर्षीय मुलाचा हत्येचा आरोप असून तो ऑगस्ट २०२४ पासून येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदी आहे.
सदर प्रकरणात मयत निखिल घोलप याचे वडील यांनी दिनांक ३/०८/२४ रोजी, मयत दिनांक १/०८/२४ पासून मिसिंग झाल्याची तक्रार दिली, आणि ओतूर पोलिस यांच्या तपासात आरोपी आणि मयत निखिल घोलप या मध्ये दिनांक १/०८/२४ रोजी वारंवार कॉल झाल्याचे सी डी आर, टॉवर लोकेशन आणि कबुली जवाब या गोष्टींच्या आधारे पोलिसांनी आरोपी आणि सह आरोपी यांना पकडले होते. मयत याचा मृत देह देखील आढळून आल्याने आणि इतर जमिनीच्या वादातून सदर हत्या करण्यात आल्याचा तपासात पोलिसांनी म्हटले आहे.
सदर प्रकरणाबद्दल त्याचा जमीन अर्ज राजगुरुनगर सत्र न्यायालयात प्रलंबित होता. परंतु सुनावणी झाली नाही, म्हणून जुन्नर येथील प्रथमवर्ग न्यायाधीश श्री. अनंत एच. बाजड साहेब यांनी त्याला पोलिस बंदोबस्तात परीक्षा केंद्र मध्ये घेऊन जाण्यासाठी दिनांक ३०/११/२४ रोजी आदेश परित केला होता. या आधी देखील आरोपी ह्याने एम पी एस सी द्वारा घेण्यात येणाऱ्या बरेच पूर्वपरीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत,
सदर गुन्ह्यात त्याला अटक केल्यामुळे त्याचे पी एस आय पदासाठीची मुलाखत त्याला देता आली नाही. सदर प्रकरणात तो निर्दोष मुक्त होण्याची दाट शक्यता आहे असे त्याचे वकील श्री सुशांत तायडे यांचे म्हणणे आहे. त्याचे न्यायालयीन कामकाज सुशांत तायडे, दिनेश जाधव, जितु जोशी, प्रज्ञा कांबळे, शुभांगी देवकुळे आणि अक्षय घोलप हे बघत आहेत.