खेड-आळंदी विधानसभेचे उमेदवार अक्षय जाधव यांचा महाराष्ट्र स्वराज्य पक्षात जाहीर प्रवेश.अक्षय जाधव यांच्या भूमिकेने तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार?

Share This News

बातमी24तास(प्रतिनिधी)

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अल्पवधित आपली राजकीय ओळख निर्माण करणारे संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेले पुणे जिल्हा शिवसेना संघटक अक्षय जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. प्रवेश होताच अक्षय जाधव यांना पक्षाचा एबी फॉर्म देऊन त्यांची अधिकृत उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे.अक्षय जाधव यांनी मागील बऱ्याच दिवसापासून खेड-आळंदी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली होती. त्यांनी निवडणुकीसाठीचा मोठे शक्तीप्रदर्शन करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर तालुक्यात मोठ्या राजकीय घडमोडी घडल्यानंतर अखेर अक्षय जाधव यांनी रविवारी(दि. २७) रोजी जाहीर प्रवेश केला. प्रवेश झाल्यानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षांचा खेड-आळंदी विधानसभेसाठीचा अक्षय जाधव यांनी अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy