बातमी24तास,
जुन्नर /आनंद कांबळे
जैन बांधवांचे द्वितीय धर्म पुण्यजाप अधिवेशन जुन्नर येथे संपन्न झाले. आजच्या आधुनिक युगात भौतिक सुखसुविधा अनेकांना प्राप्त झाली आहे परंतु मानसिक समाधान मिळत नाही,नानाप्रकराचे आजार,आर्थिक समस्यामुळे मानव अस्वस्थ झाला आहे. मनुष्याला कर्मामुळे अनेक दुखाःना सामोरे जावे लागते . त्याकर्माना दूर करण्याचे मार्ग भगवंतानी तपजप ,धर्म आराधना ,स्वाध्याय इत्यादी सांगितले आहेत.
पू .डाँ.धर्मशिलाजी म,सा च्या सुशिष्य पू.डाँ.पुण्यशीलाजी म.स,पू.डाँ.किर्तीशिलाजी म.स,पू. सिद्धीशिलाजी म.च्या सानिध्यात दोन वर्षापासून चालत असलेल्या जापग्रूपच्या महिला सा धिकांचे एकभव्य आ अधिवेशन आयोजित केले होते. जनतेच्या सामाजिक आत्मिक विकासाच्या दृष्टीने वेगवेगळ्या विषयावर नाटक, पोवाडे ,गायन इत्यादीचे आयोजन केले होते.जुन्नर संघाच्या सहयोगाने उत्सव उत्साहपूर्वक साजरा झाला. पू. डाँ.पुण्यशीलाजी म.स यांचे उद्बोधन झाले. आलेल्या जाप साधकांची अतिथी आणि सहयोगीची व्यवस्था जुन्नर संघाच्या प्रत्येक सदस्यांनी सुंदर केली होती. अनेकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, इतक्या लहान गावात इतकी मोठी व्यवस्था व आदरातिथ्य चांगले होते.