बातमी24तास(वृत्त सेवा)
धोकेदायक पद्धतीने अवैधरीत्या गॅस रिफिलींग करुन मोठ्या प्रमाणात गॅस विक्री करणा-याला एका व्यक्तीला 86 सिलिंडर टाक्या,टेम्पो सह सुमारे साडेआठ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दि 16/10/2024 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड कडील अधिकारी व अंमलदार म्हाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार प्रदिप शेलार व रणधीर माने यांना मिळालेल्या बातमीवरुन संदीप महादु जैद वय 47 वर्षे रा कुंभार आळी, कुरुळी ता. खेड जि पुणे यास त्याब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन एकुण 8,65,353/- रुपये किंमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये एकुण 75 घरगुती वापराचे, 08 व्यावसायिक व 03 लहान गॅस सिलेंडर, गॅस रिफिल करण्याचे साहित्य, गॅस वाहतुक करण्याकरीता वापरण्यात आलेला अशोक लेलंड टेम्पो असा जप्त करण्यात आला आहे. त्याचे विरुध्द म्हाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिताचे कलम 287, 288 सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा 1955 चे कलम 3,7 सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन 1908 चे कलम 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.