बातमी 24तास Web News Portal
(प्रतिनिधी आरिफ शेख)
श्री तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथील माऊलींचे प्रस्थान 11 जून रोजी होणार आहे प्रशासकीय पातळीवर यंत्रणा कामाला लागलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आळंदीच्या इंद्रायणी नदीवरील मोठ्या प्रमाणात असलेली जलपर्णी काढण्यात सुरुवात करण्यात आली होती याबाबत आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी आज नदीकाठ परिसर तसेच जलपर्णीने व्यापलेल्या परिसराची समक्ष भेट घेऊन माहिती घेतली. यावेळी आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक कैलास केंद्रे यांनी जलपर्णीच्या बाबत विस्तृत अशी माहिती दिली. जलपर्णी काढण्याचे काम किती वेळा करण्यात आले त्याचबरोबर जलपर्णी वाढण्याचा कालावधी याबाबत आयुक्त शेखर सिंग यांना आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी माहिती दिली आहे. तसेच पुढील चार दिवसात संबंधित एजन्सी कामाला वेळ घेत काम पूर्ण करावे अशी निर्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर यांनी दिले आहे