बातमी 24तास Web News Portal
(प्रतिनिधी आरिफ शेख)
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळा 11 जून रोजी सुरू होत आहे माऊलींच्या पादुका चांदीच्या रथामध्ये पंढरीला जातात आणि या रथाला असणाऱ्या बैल जोडीचा मान हा भोसले कुटुंबातील घराण्याला मिळालेला आहे.
श्री तीर्थक्षेत्र अलंकापुरी मध्ये आज या सोन्यामोन्या ची दिमाखात मिरवणूक काढण्यात आली मोठ्या प्रमाणात पंढरीचे वारकरी या मिरवणुकीमध्ये सामील होते आळंदी कर ग्रामस्थ भोसले घराण्यातील सर्व परिवार सदस्य यांनी अतिशय उत्साहामध्ये आळंदीतून प्रदक्षिणामारत माऊलींच्या रथाला जोडल्या जाणाऱ्या बैल जोडीची मिरवणूक काढली ग्रामस्थांनी जागोजागी या बैल जोडीचे स्वागत करत दर्शन घेतले.माऊलींच्या वर निष्ठा असणारे भाविक मनोभावे दर्शन करताना दिसले मूळच्या कर्नाटक राज्यातील निपाणी येथील गावातून मूळ नाव असलेले सर्जा राजाची बैल जोडी ही सुमारे तीन लाख रुपयांना तुळशीराम भोसले आणि रोहित भोसले यांनी विकत आणलेले आहे. आळंदी भोसले घराण्याने विकत आणल्यानंतर या बैल जोडीला सोन्या मोन्या असे नामकरण केलेले आहे. माऊलींच्या रथासाठी असणाऱ्या बैलजोडीची विशेष काळजी घेतली जात आहे. सकाळ संध्याकाळ यांना फिरवणे त्यांच्या खाण्याची व्यवस्था कडे लक्ष देणे तसेच गावाच्या पिठामध्ये गावरान तूप मिळवून ते त्यांना कारण्याची विशेष व्यवस्था पाहिली जात आहे.
आषाढी वारीसाठी नवीन बैल जोड घेण्याची परंपरा आळंदीत आहे ज्या घराण्याला मान मिळतो ते घराणं ही बैल जोडी विकत आणतात.बैल जोडी खरेदी करताना सदृढ बैल जोडी घेतली जाते यामध्ये विशेषता बैलाची उंची पाहिली जाते. माऊलींच्या चांदीच्या रथाला ही बैल जोडी जोडली जाणार आहे. बैल जोडी समितीच्या वतीने दरवर्षी हा मान वेगवेगळ्या घराण्यांना दिला जातो. यामध्ये कुऱ्हाडे, घुंडरे, भोसले, वरखडे, रानवडे ,या परिवारांचा समावेश आहे.त्यापैकी भोसले घराण्याला हा मान मिळालेला आहे.