बातमी 24तास Web News Portal
(प्रतिनिधी आरिफ भाई शेख)
इंद्रायणी काठी देवाची आळंदी.. लागली समाधी ज्ञानेशाची अशा आळंदीची व्यथा उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत याची लाज वाटावी ज्या इंद्रायणी मातेच तीर्थ म्हणून प्राशन केले जाते.त्या इंद्रायणी नदीमध्ये मैला मिश्रित, रसायन युक्त पाणी सोडून किती किती काळ लोटला.आणि इंद्रायणी दूषित करणाऱ्यांकडे कसं डोळे झाकपणा करत आहे हेही जग जाहीर आहे.आषाढी वारी तोंडावर येऊन ठेपली आहे. जलपर्णी काढण्यासाठी प्रशासनांने कंबरही कसली. परंतु मैला मिश्रित घाणेरडे पाणी नदीत सोडून जलचर प्राण्यांच्या जीवाशी खेळ त्याची दयामाया तर नाहीच. परंतु हाडामासाच्या माणसांच्या वरही अन्याय करण्याचे पाप करणाऱ्या कंपन्यांना झुकत माफ दिले जात आहे का? …अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ..येथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. याचीही जाण जल प्रदूषण करणाऱ्या निर्गठ्यांना नाही. कारवाईचा फक्त प्रदूषण महामंडळाने केलेला फार्स आणि इंद्रायणी मातेचे दूषितिकरण करणाऱ्यांचं पाप ही शोकांतिका आहे. पंढरीची वारी भरणार आहे माऊलींचे भाविक इंद्रायणी स्नान करणार आहेत. तोंडावर आलेली वारी.. तरीही मात्र अतिशय निर्दयपणे, राक्षसी प्रवृत्तीच्या कृत्यांना मात्र आळा बसत नाही आणि आळंदीच्या इंद्रायणी नदी त दूषित पाणी आल्याने सर्व फेसळलेले पाणी आजही पुन्हा आळंदीच्या माऊलींची इंद्रायणीत दिसून आले. ना लाज आहे.ना कोणती खंत. गोरगरीब भाविक अनवाणी पायाने.. माऊली माऊली म्हणत …पंढरीला जाईल तो याच इंद्रायणी मध्ये स्नान करून.. माऊलींचे भक्त आयुष्याच पुण्य मिळावं म्हणून याच इंद्रायणीचे पाणी प्राशन करणार तीर्थ म्हणून…आणि डोळ्याची झापड काही उघडेना.. इंद्रायणी नदी प्रदूषित करण्याचं पाप काही कमी होईना.. भगवान श्रीकृष्ण महाभारतात म्हणतात पाप पचत नाही…..'”भेटी लागी जीवा. लागलीसी आस.पाहे रात्रंदिवस वाट तुझी*” या आशेने येणारा भाविक. इंद्रायणीच्या तीरावर पुण्य प्राप्त करण्यासाठी उभा राहील आणि इंद्रायणी दूषित करण्यासाठी दोषी असलेल्या कंपन्या मात्र या इंद्रायणी मातेचे लचके तोडताना दिसतील.हे दुर्गंधीयुक्त पाणी. रसायन मिश्रित पाणी थांबवणे एवढे अवघड आहे का?. 2008 साला पूर्वी संथ वाहत होती इंद्रायणी.. आणि आज नेमके असे काय झाले की ..हे पाप उघड्या डोळ्यांनी पाहताना आणि हे पाप समाजामध्ये होत असताना .गेंड्याच्या कातडी पांघरून बसलेल्या निर्गट पापी माणसांना शासन करणार तरी कोण? असो ..तरी हे मात्र नक्कीच महाभारतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात पाप पचत नाही. आळंदीतील इंद्रायणी पुन्हा दूषित झाली.. हे फेसाळलेलं पाणी येत आहे जीवाला घातक असे रासायनिश्चित रसायने आणि मैला मिश्रित पाणी सरळ सरळ नदीमध्ये सोडले गेले. वारंवार कारवाईची मागणी होते. कारवाई झाली पाहिजे. परंतु त्याबाबत मात्र वाटाण्याच्या अक्षदा लावताना दिसत आहेत. हे पाण्याचं पाप पचणार नाही