अक्षय जाधव यांच्या “आपला अक्षय” आपल्या दारीं संवाद दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद
बातमी24तास (वृत्त सेवा ): मी तालुक्याच्या स्वाभिमानासाठी या निवडणूकीला सामोरे जात आहे. माझ्या तालुक्यातील आणि मतदार संघातील आदिवासी भागाचा दौरा करतोय या दौऱ्याच्या निमित्ताने खरंच तालुक्यातील आदिवासी बांधवाच्या किती ज्वलंत समस्या आहेत आणि त्या फक्त राजकीय अनास्तेपायी सोडवल्या जात नाहीत हे लक्षात येत आहे.
खेड-आळंदी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुकलेलं अक्षय जाधव यांनी सोमवार(दि. १४) रोजी निवडक पदाधिकारी व तरुण सहकार्याच्या साथीने “आपला अक्षय” आपल्या दारीं संवाद दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी ते बोलत होते.
या संवाद दौऱ्याला तालुक्यातील सर्वसामान्य जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.अक्षय जाधव यांनी खेड तालुक्याचे आराध्य दैवत भीमाशंकर येथे दुग्ध अभिषेक करून संवाद दौऱ्याला सुरुवात केली. दौऱ्यात अक्षय जाधव यांनी जेष्ठ नागरिक, महिला भगिनीं, तरुण-तरुणी, विद्यार्थी यांच्या समस्या जाणून घेतल्या. माझ्या आदिवासी बांधवाच्या हाताला काम नाही, शिक्षणाच्या, आरोग्याच्या, दळणवळणाच्या सुविधाचा अभाव दिसून येतो. तीन वेळा आपल्याला तालुक्याचे प्रतिनिधित्व करायला मिळालं त्यात आपण काय केले हे आदिवासी बांधवाच्या परिस्थितीवरून दिसून येते असे अक्षय जाधव यांनी बोलताना सांगितले.
तालुक्यातील हेच चित्र बदलविण्यासाठी आणि हक्काचा लोकप्रतिनिधी तालुक्याला मिळावा. त्याचं बरोबर लोकप्रतिनिधीचे हात घेणारे नसावेत तर, सर्वसामान्य जनतेला काही तरी देणारे हात असायला हवेत असा जनतेच्या हिताचा अजेंडा घेऊन मी या निवडणूकीला सामोरे जात आहे.अक्षय जाधव यांच्या झंजावती संवाद दौऱ्यामुळे विरोधी उमेदवारांच्या पाया खालची वाळू सरकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यावेळची विधानसभा निवडणूक परिवर्तनाची निवडणूक ठरल्या शिवाय राहणार नाही. या दौऱ्यावेळी शिवसेना युवासेना प्रमुख धनंजय पठारे, युवती तालुका प्रमुख आरती कांबळे, अध्यक्ष वैद्यकीय मदत कक्ष पुजा राक्षे, सुप्रिया मुळूक, उपतालुका प्रमुख अंबर सावंत, जालिंदर पोखरकर, सरपंच मनोहर पोखरकर, विभाग प्रमुख अनिल कौदारे, माजी उपसरपंच समाधान पानसरे, ऋषीं मुळूक, शुभम बालघरे, डेहने सरपंच शंकर कोरडे,सौरभ कड,गणेश कोरडे, माऊली कोरडे, नायफडं सरपंच करिष्मा बांबळे,, उपसरपंच रोहिदास भाईक आदी. पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थितीत होते.