बातमी24तास, (वृत्त सेवा)
चाकण – शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक अक्षय जाधव यांनी शनिवार(दि. १२) रोजी दसऱ्यानिमित्त संविधान पूजनाचे आयोजन केले करून खेड-आळंदी विधानसभा मतदारसघांतून निवडणुक लढवण्याचा निर्धार पक्का केला.
खेड-आळंदी विधानसभा मतदासंघांतील इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार यांच्या गटाचे दिलीप मोहिते पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत. शिंदे गट शिवसेनेचे अक्षय जाधव यांनी गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. त्यांना युवक वर्गातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
दसरा सणाच्यानिमित्ताने शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्ह्याचे संघटक अक्षय जाधव यांनी आपल्या घरी दसरा शस्त्रपूजनाच्या निमित्ताने संविधान पूजन करून आता मी आहेच असं म्हणत विधानसभा लढायचीच असा कार्यकर्त्यांच्या समवेत निर्धार केला. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, तालुक्याच्या सर्वांगीन विकासासाठी मी मतदारसंघातील माय बाप जनतेच्या आशीर्वादाने निवडणूकीला सामोरे जायचे ठरवले आहे. त्यासाठी त्यांनी दसरा सणाचे औचित्य साधले होते.अक्षय जाधव यांनी सोशल माध्यमातून सर्व खेड-आळंदी मतदारसंघातील सर्व मायबाय जनतेला दसरा सणाच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या.आज दसऱ्याचा सण असल्याकारणाने आजच्या दिवशी तालुक्यातल्या प्रत्येकाच्या घरोघरी शस्त्रांची पूजा केली जाते. हिंदू धर्मात शस्त्रांची पूजा करणे हे अत्यंत महत्वपूर्ण मानलं जातं. दसऱ्याच्या निमित्ताने व तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य यावे यासाठी शस्त्रे हातात घेतली व त्यांनी बहुतांश युद्ध मोहिमा याचं दसरा सणाच्या दिवशी केलेल्या आहेत. याचं दसरा सणाचे औचित्य साधून आपला देश ज्या संविधावर चालतो त्या संविधानाच्या प्रतीचे देखील अक्षय जाधव यांनी पूजन केले.शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हा संघटक अक्षय जाधव खेड आळंदी मतदारसंघातून हे शिंदे गटाकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छूक व आग्रही आहेत. यापुढे अक्षय जाधव काय राजकीय भूमिका घेतात याकडे सगळ्या तालुक्याचे लक्ष लागले आहे.