बातमी24तास (प्रतिनिधी आरिफ भाई शेख)
आळंदी( खेड)माऊलींच्या मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. स्थानिका पासून आजूबाजूच्या गावातील परिसरांचा सुद्धा याचा समावेश असतो. दर्शन घेत असताना मुख्य गाभाऱ्यामध्ये साठीच्या वयातील एक महिला अशोभनीय वाक्यप्रचार करत भाविकांसोबत असभ्यवर्तन करत असते. याची तक्रार बऱ्याच नागरिकां, भाविकांतून होत होती. त्याबाबतची कल्पना आळंदी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी विश्वस्त योगी निरंजन स्वामी यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी सदर महिला पुन्हा गाभाऱ्यातील दर्शन व्यवस्थेच्या ठिकाणी दिसणार नाही अशा सूचना दिलेल्या आहेत. मुळात स्वयंघोषित स्वयंसेवक आणि सेवा करण्याचे उद्देशाने येणारे अनधिकृत व्यक्तींमुळे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांची नाहक अपप्रचार होत आहे. सदर स्वयंघोषित कर्मचारी असल्याचा वाव आणतात. तसेच कुठेही तक्रार केली तरी फरक पडत नसल्याचा वाद-विवादही घालतात. तसा अनुभवही आलेला आहे. मोठ्या संख्येने येणारे भाविक मात्र निशब्द होत निघून जातात. आणि यामुळे तीर्थक्षेत्र आळंदी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीची कारण नसताना बदनामी होते. याचा विचार करत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी कडून तशा सूचना देण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध वृत्तपत्रांमध्ये देण्यात आलेली आहे. त्याबाबत बऱ्याच दिवसापासून असलेली तक्रार दखल घेतल्याने भाविक समाधान व्यक्त करत आहेत.