बातमी 24तास (प्रतिनिधी आरीफ भाई शेख) आळंदी येथे बकालपणामुळे मोठ्या प्रमाणात चोरांचा वावर वाढला आहे. यातच धक्कादायक बाब म्हणजे आळंदी पोलीस स्टेशन लगत असलेल्या घरातच चोरट्याने चोरी केली. अशी बातमी प्रसिद्ध माध्यमातून समोर येत आहे. त्याचबरोबर आळंदी पोलीस कर्मचारी संख्या वाढली परंतु गस्त मात्र कमी झाली अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. अगदी तसेच अगदी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या घरापुढे उभे केलेली बुलेट मोटरसायकलचे लॉक तोडून चोरी करण्यात आली आहे.
सदर घटना रविवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 ते 29 सप्टेंबर 2024 दरम्यान घडली. अशी फिर्याद हर्ष संजय भोसले राहणार कॉसमॉस बँक जवळ आळंदी देवाची पोलीस स्टेशन शेजारी यांनी दिलेली आहे. आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत आळंदी पोलीस शोध घेत आहे. तसेच आवारी हॉस्पिटल जवळील परिसरामध्ये रात्रीच्या वेळी आणखीन एक होंडा कंपनीची गाडी चोरी करण्याचा प्रयत्न फसला. बाहेरील चोरटे मोठ्या प्रमाणात आळंदीत आलेले आहेत त्याचबरोबर मोफत अन्नदान जे मूळ गरजू लोकांसाठी असते त्याचा गैरवापर होत असल्याने सदर चोरटे पोसले जात आहेत. वारकरी संप्रदायासाठी मधुकरी असते भाविक भक्तांना अन्नदान व्हावं ही भावना लोकांमध्ये असते मात्र काही दारूडे याचा गैरफायदा घेतात आणि ते अन्न मोफत मिळत असल्याने इतर बकालपणा वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. दरम्यान आळंदी पोलीस स्टेशन ने रात्रीची गस्त चालू करण्याची मागणी होत आहे.