बातमी24तास (कल्पेशराघवेंद्रा भोई )खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती च्या निवडणुकीला स्थगिती मिळविण्यात आमदार दिलीप मोहिते यशस्वी झाले आहेत.निवडणुक होण्यासाठी काही तास उरले असतानाच निवडणूक स्थगितीचा आदेश आला. बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे व उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर 28 रोजी निवडणूक होणार होती. दोन वर्षांपूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत 18 पैकी 11 जागांवर आमदार गटाचे उमेदवार विजयी झाले होते कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे वर्चस्व असूनही त्यांच्याच गटातील तीन सदस्य विरोधी गटांमध्ये सहलीला गेल्याची खात्रीशीर माहिती मिळत असून यामुळेच आमदार मोहिते यांनी निवडणूक स्थगित व्हावी यासाठी प्रयत्न केले.